सरपंचाला 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय 39) याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले (Sarpanch caught red-handed while accepting bribe of 40,000 rupees in Sangli).

सरपंचाला 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
सरपंचाला 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

सांगली : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय 39) याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. करगणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मंगळवारी (15 जून) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सरंपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Sarpanch caught red-handed while accepting bribe of 40,000 rupees in Sangli).

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी करगणी येथून रस्ता काँक्रीट करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाचे बिल मंजूर करुन जमा केल्याच्या मोबदल्यात करगणीचे सरपंच गणेश खंदारे याने बिलाच्या 4 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पडताळणी केली असता सरपंच खंदारे याने तक्रारदारांकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले (Sarpanch caught red-handed while accepting bribe of 40,000 rupees in Sangli).

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई कशी केली?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रादाराच्या तक्रारीनुसार करगणी ग्रामपंचायतीजवळ सापळा रचला. त्यानंतर सरपंच खंदारे याला तक्रारदारांकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. अखेर याप्रकरणी संरपंचाविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, कर्मचारी संजय कलकुटगी, अविनाश सागर, संजय संकपाळ, सलीम मकानदार, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा : दुकानासमोर भिकारी बनून रेकी, नंतर दरोडा, देशभरात धुमाकूळ माजवणारी टोळी नालासोपाऱ्यात जेरबंद