Aurangabad : बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, बहिणीवर 9 महिने अत्याचार; मुलीने केली आत्महत्या

देशात आत्तापर्यंत अशी अनेक प्रकरणं उजेडात आली आहेत. त्यामध्ये आरोपीला कोर्टाने शिक्षा सुद्धा सुनावली आहे. तरी सुध्दा अशी प्रकरणं घडत असल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे.

Aurangabad : बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, बहिणीवर 9 महिने अत्याचार; मुलीने केली आत्महत्या
बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, बहिणीवर 9 महिने अत्याचार; मुलीने केली आत्महत्या
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Aug 12, 2022 | 9:57 AM

औरंगाबाद : एकीकडे भाऊ-बहिणीचे नाते भक्कम करणारा सण म्हणजे रक्षाबंधन (Rakshabandhan) असताना, मात्र दुसरीकडे भाऊ बहिणाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. चुलत भाऊच आपल्या अल्पवयीन बहिणीवर तब्बल नऊ महिन्यांपासून बलात्कार करत होता. पीडित अल्पवयीन मुलीने औषध घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील वैजापूर तालुक्यात घडली आली आहे. याप्रकरणी विरगाव पोलिसांनी आरोपी चुलत भावाला ताब्यात घेऊन अटक केली असून, त्याच्यावर पोक्सो कायद्यान्वये तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडल्यापासून औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात खळबळ माजली आहे. काल रक्षाबंधन असल्यामुळे सगळ्यांनी घरी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरणं होतं.

परिसरात शांतता पसरली आहे

काल राज्यात सगळीकडे रक्षाबंधन असल्यामुळे उत्साहाचं वातावरण होतं. परंतु आत्महत्येचं कारण उघडकीस आल्यानंतर परिसरात एकदम शांतता पसरली आहे. सख्खा चुलत भाऊ मागच्या 9 महिन्यापासून अत्याचार करीत होता. इतके दिवस होत असलेला अत्याचार सहन न झाल्याने काल तरुणीने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कुटुंबातील लोकांना याची माहिती लागली. त्यानंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तरुणीने पोलिसांना कशामुळे विष प्राशन केले त्याचे कारण सांगितल्यानंतर संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल त्या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. सध्या तिथल्या परिसरात खळबळ माजली आहे.

प्रकार ऐकताचं पोलिस चक्रावले

देशात आत्तापर्यंत अशी अनेक प्रकरणं उजेडात आली आहेत. त्यामध्ये आरोपीला कोर्टाने शिक्षा सुद्धा सुनावली आहे. तरी सुध्दा अशी प्रकरणं घडत असल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. काल हा प्रकार कानावर आल्यानंतर पोलिस सुध्दा चक्रावले होते. त्यांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले. तसेच त्यांची कसून चौकशी करणार असल्याचे देखील सांगितले आहे.