संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुलगी झाली हो मालिकेचं चित्रीकरण रोखलं; कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुलगी झाली हो मालिकेचं चित्रीकरण रोखलं; कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
संभाजी ब्रिगेडचं आंदोलन

अनेक दिवसांपासून किरण माने प्रकरण गाजत आहे, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 20, 2022 | 7:24 PM

सातारा – अभिनेते किरण माने (KIRAN MANE) यांना मुलगी झाली हो या मालिकेतून अचानक बाहेरचा रस्ता दाखवणा-या निर्माते तसेच प्रॉडक्शन यांना सेटवरती जाब विचारण्यासाठी गेलेल्या संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी चित्रीकरणं रोखलं. त्यानंतर तिथे गेलेल्या पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या (SAMBHAJI BRIGADE) 9 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतल्याची भुईंज पोलिसांनी (BHUING POLICE) दिली आहे. किरण माने बहुजन असल्याने त्याच्यावर अन्याय झाला असल्यामुळे आम्ही जाब विचारण्यासाठी इथं आलो आहोत असं व्हिडीओ चित्रीकरणात कार्यकर्त्या बोलत आहे.

अनेक दिवसांपासून किरण माने प्रकरण गाजत आहे, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. किरण माने यांच्यावर सहकलाकारांनी अपशब्द वापरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनेक सहकलाकारांनी किरण माने यांची बाजू घेतल्याने तिथं नेमकं काय झालं असेल हे स्पष्ट होतं नव्हतं. अन्याय झाल्याने किरण मानेनी शरद पवार यांना भेट दिली होती. तसेच अनेकांनी किरण मानेंना सोशल मीडियाच्या माध्यमातून सपोर्ट दर्शविला होता.

जितेंद्र आव्हाड यांनी आज किरण माने, सतिश राजवाडे आणि अमोल कोल्हे यांना घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु आज त्यावर तोडगा निघू शकला नाही. पुढच्या मिटींगमध्ये कदाचित त्यावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली आहे. किरण माने सामान्य घरातला आहे, यावर तोडगा निघावा यासाठी मी पुढाकार घेतला असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

भुईंज पोलिसांनी तिथं पोहचल्यानंतर 9 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर मालिकेचं चित्रीकरण पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश कांबळे यांनी दिली.

किरण मानेंना मिळाला नवा चित्रपट; चित्रीकरण सुरू ?

लतादिदींच्या प्रकृतीत सुधारणा नाही, डॉक्टर म्हणाले, ‘किती दिवसात बऱ्या होतील सांगणं कठिण’

उत्तरप्रदेशच्या राजकारणात कंगनाची एन्ट्री, एक फोटो शेअर आणि सोशल मीडियावर चर्चाच चर्चा!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें