AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना नेमकं काय झालं? आजार किती गंभीर? मोठी हेल्थ अपडेट समोर

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. ट्रम्प यांच्या हातावर एक जखम दिसली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना नेमकं काय झालं? आजार किती गंभीर? मोठी हेल्थ अपडेट समोर
donald trump health updateImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 23, 2026 | 4:11 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या ते ग्रीनलँडच्या मुद्द्यांवरून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी जोरदार भाषण केले. यावेळी समोर आलेल्या फोटोमुळे ट्र्म्प यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कारण ट्रम्प यांच्या हातावर एक जखम दिसली. यामुळे ट्रम्प यांच्या प्रकृतीबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता याबाबत व्हाईट हाऊसने स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हातावर निळ्या रंगाची जखम

समोर आलेल्या फोटोमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या डाव्या हातावर एक जखम दिसली. त्यांचा हात काळा निळा झाला होता. दावोस शिखर परिषदेवरून परतताना पत्रकारांनी ट्रम्प यांना या जखमेबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना ट्रम्प यांनी ही जखम एका किरकोळ अपघातामुळे झाली असल्याची माहिती दिली. ‘माझा हात टेबलावर आदळला त्यामुळे ही जखम झाली. त्यानंतर त्यावर क्रीम लावली होती. आता मी पूर्णपणे ठीक आहे.’

जखम कशामुळे झाली?

हाताच्या जखमेबाबत अधिक माहिती देताना ट्रम्प म्हणाले की, हातावर जखम होण्याचे आणखी एक कारण म्हणजे मी नियमित अ‍ॅस्पिरिनचे सेवन करतो. अ‍ॅस्पिरिन घेतल्याने जखम होण्याचा धोका वाढतो.जेव्हा तुम्ही मोठी अ‍ॅस्पिरिन घेता तेव्हा ते म्हणतात की त्यामुळे सहजपणे जखम होतात. मात्र डॉक्टरांनी मला सांगितले आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात औषध घेण्याची आवश्यकता नाही. मला कोणताही धोका पत्करायचा नाही त्यामुळे मी औषध घेत आहे.

व्हाईट हाऊसने काय म्हटले?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर बोलताना व्हाईट हाऊसनेही उत्तर दिले आहे. प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी एका निवेदनात म्हटले की, ‘ट्रम्प यांचा हात टेबलाच्या कोपऱ्यावर आदळला, ज्यामुळे जखम झाली आहे.’ दरम्यान, ट्रम्प यांच्या हाताला यापूर्वीही जखम झाली होती. त्यावेळी त्यांनी आपला हात मेकअप किंवा पट्टीने झाकला होता. त्यावेळीही ट्रम्प यांनी अ‍ॅस्पिरिनचा जास्त डोस घेतल्यामुळे ही जखम झाली असल्याचे म्हटले होते.

बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.