India-Ukraine Talk : भारताबद्दल असं बोलून युक्रेननेच डोनाल्ड ट्रम्प यांना पाडलं तोंडावर
India-Ukraine Talk : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतविरोधी भूमिकेत आहेत. रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीसाठी ते भरपूर प्रयत्न करत आहेत. पण त्यांना ते जमत नाहीय. आता युक्रेनने भारताबद्दल जे मत व्यक्त केलय, त्यामुळे निश्चित त्यांना मिर्च्या झोंबतील. गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रेई सिबिहा यांची चर्चा झाली.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रेई सिबिहा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर एस. जयशंकर यांनी युक्रेन संघर्ष लवकर संपावा, हीच भारताची भूमिका असल्याच सांगितलं. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फोनवर चर्चा करुन युद्ध लवकर कसं संपेल? त्या बाबत विचारविनिमय केला. “आमची द्विपक्षीय सहकार्यसोबत युक्रेन संघर्षावर सुद्धा चर्चा झाली. हा संघर्ष लवकर संपवण्याच आणि कायमस्वरुपी शांततेच भारत समर्थन करतो” असं जयशंकर यांनी एक्सवर म्हटलं आहे.
सिबिहा यांनी युद्धाची वर्तमान स्थिती आणि न्यायपूर्ण शांतता प्राप्तीसाठी युक्रेनकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची जयशंकर यांना माहिती दिली. युद्धाची पूर्ण समाप्ती आणि व्यापक आंतरराष्ट्रीय शांतता प्रयत्नांच्या समर्थनासाठी भारताचा आवाज आणि सक्रीय भूमिकेवर युक्रेनने विश्वास व्यक्त केला. सिबिहा यांनी सोशल मीडियावर तसं लिहिलय. युद्ध समाप्तीसाठी युक्रेनने भारतावर विश्वास व्यक्त केलाय. निश्चितच यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मिर्च्या लागतील. भारत युद्ध सुरु ठेवण्यासासाठी रशियाला बळ देतो असा ट्रम्प यांचा आरोप आहे. पण युक्रेनच म्हणणं आहे की, भारत युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न करतोय. एकप्रकारे त्यांनी ट्रम्पनाच तोंडावर पाडलय.
दोन्ही नेते कधी भेटणार?
या महिन्याच्या अखेरीस संयुक्त राष्ट्र महासभेत ते आणि जयशंकर यांची भेट होणार आहे, सिबिहा यांनी ही माहिती दिली. न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत उच्च स्तरीय बैठकी दरम्यान दोन्ही नेते भेटणार आहेत. राजकीय चर्चा, आगामी उच्च स्तरीय संपर्क, आर्थिक सहकार्य, औद्योगिक आणि अन्य क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांद्वारे विकास कायम सुरु ठेवण्यावर सहमती झाली.
मार्ग शोधणं हे मानवतेच आवाहन
तीन दिवसांपूर्वी चीनच्या तियानजिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली होती. त्यानंतर आता जयशंकर-सिबिहा यांच्यात फोनवरुन चर्चा झाली आहे. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांच भारत स्वागत करतो, असं पीएम मोदी पुतिन यांना म्हणाले. लवकरात लवक संघर्ष संपवण्यासाठी मार्ग शोधणं हे मानवतेच आवाहन आहे असं पीएम मोदी म्हणाले.
…म्हणून युक्रेनने भारताशी संपर्क वाढवलाय
रशिया-युक्रेन युद्धात आता भारताची भूमिका महत्वाची बनली आहे. या युद्धामुळेच भारताला 50 टक्के टॅरिफचा सामना करावा लागतोय. भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करतो, त्यामुळे रशियाला युक्रेन युद्ध सुरु ठेवण्यासाठी बळ मिळतं, असा डोनाल्ड ट्रम्प यांचा तर्क आहे. त्यामुळे त्यांनी भारतावर अव्वाच्या सव्वा टॅरिफ लावला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, जेणेकरुन पुतिन यांच्या वॉरमशिनला बळ मिळणार नाही, यासाठी अमेरिका-युरोपकडून प्रयत्न केले जात आहे. युक्रेनने सुद्धा भारताशी चर्चा, संपर्क याच कारणासाठी वाढवला आहे. म्हणून भारत आणि युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेली चर्चा या दृष्टीने महत्वाची ठरते.
