‘काही लोकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली, पण मी ठणठणीत बरा’, अफवा पसरवणाऱ्यांना अमित शाहांचे प्रत्युत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे (Amit Shah clarifies on rumours).

'काही लोकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली, पण मी ठणठणीत बरा', अफवा पसरवणाऱ्यांना अमित शाहांचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली :माझी तब्येत पूर्णपणे ठणठणीत बरी असून मला कुठल्याही आजाराची (Amit Shah clarifies on rumours) लागण झालेली नाही. सोशल मीडियावर माझ्या तब्येतीबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. काही लोकांनी तर ट्विटवर माझा मृत्यू व्हावा, यासाठीदेखील प्रार्थना केली आहे”, असं स्पष्टीकरण अमित शाह यांनी ट्विटरवर दिलं आहे. अमित शाह यांच्या प्रकृतीबाबत काही लोकांकडून सोशल मीडियावर अफवा पसरवली जात आहे. या अफवा पसरवणाऱ्यांनाच अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Amit Shah clarifies on rumours).

“देश सध्या कोरोनाशी झुंजत आहे. देशाचा गृहमंत्री या नात्याने मी दररोज उशिरा रात्रीपर्यंत कामात व्यस्त असतो. सुरुवातीला या अफवांकडे मी लक्ष दिलं नाही. लोकांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर जी अफवा पसरली आहे त्याचा त्यांना आनंद घेऊ द्यावा, असं मला वाटत होतं”, असं अमित शाह म्हणाले.

“या अफवांमुळे भाजप पक्षाचे अनेक कार्यकर्ते चिंतेत पडले. ते सोशल मीडियामार्फत तब्येतीची विचारपूस करु लागले. त्यांच्या चिंतेकडे मी दुर्लक्ष करु शकत नाही. त्यामुळे मी यावर स्पष्टीकरण देत आहे. मी पूर्णपणे ठणठणीत बरा असून मला कुठलाही आजार झालेला नाही”, असं स्पष्टीकरण शाहांनी दिलं.

“या अशाप्रकारच्या अफवा माझी तब्येत आणखी सुदृढ करतील. त्यामुळे या चुकीच्या आणि व्यर्थ चर्चांकडे लक्ष न देता मला माझं काम करु द्यावं आणि स्वत:ही आपापली कामे करा”, असा सल्ला अमित शाहांनी दिला.

“याशिवाय ज्या लोकांनी अफवा पसरवल्या आहेत त्यांच्याबाबत माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा राग किंवा द्वेष नाही. मी आपला सर्वांचा आभारी आहे”, असंदेखील अमित शाह म्हणाले आहेत.

संबंधित बातमी :

स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करा, केंद्राकडे जादा रेल्वे गाड्यांची मागणी करा, चंद्रकांत पाटलांचा सरकारला सल्ला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI