AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंड्यांपेक्षा अधिक प्रोटीन्स… सोयाबीन खाताय? हे कायम लक्षात ठेवा…

सोयाबीन हा एक अद्भुत पोषणसंपन्न पदार्थ आहे, जो हाडांच्या आरोग्यासाठी आणि हृदयरोग टाळण्यासाठी फायदेशीर आहे. सोयाबीनमधील फायटोइस्ट्रोजेन हाडांची घनता वाढवण्यास मदत करते, विशेषतः रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांसाठी. त्यातले अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात.

अंड्यांपेक्षा अधिक प्रोटीन्स... सोयाबीन खाताय? हे कायम लक्षात ठेवा...
Soybean
| Edited By: | Updated on: Mar 16, 2025 | 3:50 PM
Share

सोयाबीन एक पोषणपूर्ण आहार आहे. हे सर्व लोकांना माहीत आहे. तथापि, या गोष्टीची माहिती असतानाही, सोयाबीन संदर्भात अनेक वेळा उपहासात्मक टिप्पण्या ऐकायला मिळतात. हाड नसलेलं मटण असंही सोयाबीनला गंमतीने म्हटलं जातं. पण सोयाबीनच्या फायदेशीर गुणधर्मांविषयी जाणून घेतल्यावर, तुम्ही असे उपहास करणार नाही. उलट सोयाबीनचा आहारात उपयोगच कराल. चांगल्या प्रकारे शिजवलेली सोयाबीन चवीला अप्रतिम असतात. सोयाबीनमध्ये असलेल्या पोषणतत्त्वामुळे, ते आपल्या शरीरावर खूप फायदेशीर प्रभाव टाकतात.

सोयाबीनमध्ये भरपूर पोषणतत्त्व असतात. आपल्याला अनेक वेळा पाय, कंबर, हात किंवा गळ्याला वेदना होतात. काही लोकांमध्ये ही समस्या दीर्घकाळ असते. संधिवातामुळे त्रस्त रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. या वेदनेपासून मुक्त होण्यासाठी सोयाबीन अत्यंत प्रभावी आहे. डॉक्टरांच्या मते, आठवड्यात किमान तीन दिवस 30 ते 50 ग्रॅम सायोबीन खाल्ल्याने हाडांचं दुखणं रोखलं जाऊ शकतं. विशेषतः, मासिक पाळीच्या समाप्तीच्या (रजोनिवृत्ती) नंतर महिलांच्या हाडांमध्ये कॅल्शियमची पातळी कमी होते. यामुळे हाडं कमजोर होतात.

दररोज सोयाबीनमध्ये असलेलं फाइटोइस्ट्रोजेन समृद्ध अन्न समाविष्ट केल्याने कॅल्शियमची कमतरता दूर होते. रजोनिवृत्तीनंतर महिलांना किमान 6 महिने 30 ग्रॅम सोयाबीन खाणे आवश्यक आहे. सोयाबीनमध्ये अंड्यांपेक्षा अधिक प्रोटीन असतं. सोयाबीनमुळे स्थुलता कमी होते. हाडं मजबूत राहतात. कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

हाडांसाठी उपयुक्त

सोयाबीनमधील प्रथिनं हाडांच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. सोयाबीनमध्ये आयसोफ्लेवोन आणि लेसिथिन असतात. दोन्ही घटक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहेत. हे कमी घनता असलेल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण सामान्य ठेवण्यास मदत करतात. कमी घनता असलेला कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा करून रक्तप्रवाह सुरळीत राहतो. सोयाबीनमधील अँटीऑक्सिडंट्स या समस्येविरुद्ध लढण्यात मदत करतात. याशिवाय, त्यात असलेल्या आयसोफ्लेवोनमध्ये अत्यंत शक्तिशाली फाइटोइस्ट्रोजेन असतात. हे घटक त्वचा आणि केसांना तेजस्वी आणि चमकदार बनवण्यास मदत करतात.

हे कायम लक्षात ठेवा…

सोयाबीनमधील लेसिथिन रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करते आणि हृदय आणि मेंदूला निरोगी ठेवते. यामुळे वयोमानानुसार होणारी त्वरीत वृद्धत्व प्रक्रिया कमी होऊ शकते. त्याचबरोबर, लेसिथिन शरीराच्या चरबीच्या मेटाबॉलिजम क्रियेला चालना देतो. नियमितपणे सोयाबीन खाल्ल्याने उच्च घनता असलेल्या कोलेस्ट्रॉल आणि कमी घनता असलेल्या कोलेस्ट्रॉलमधील संतुलन राखता येते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. सोयाबीनमधील प्रथिनं देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. रक्तात ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण सामान्य ठेवण्यासाठी सोयाबीनमधील फायबर्स खूप प्रभावी ठरतात. पण दिवसाला 50 ग्रॅमपेक्षा जास्त सोयाबीन खाणे शरीरासाठी योग्य नाही, हे कायम लक्षात ठेवा.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....