Bhandara Roads : भंडाऱ्यात पावसाने रस्त्यांची दुरावस्था, हत्तीडोईतील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खडतर ‘मार्ग’

कित्तेकदा दुचाकीस्वार गाडी स्लीप होऊन पडतात, अशावेळी दुचाकीचालकांचीही पंचाईत होते. गावकरी शेतीच्या कामासाठी याच रस्त्याने येतात. बाहेरगावी जायचं म्हटलं तर दुसरा ड्रेस सोबत घेऊन गेल्याशिवाय प्रवास करणं कठीण आहे.

Bhandara Roads : भंडाऱ्यात पावसाने रस्त्यांची दुरावस्था, हत्तीडोईतील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खडतर मार्ग
हत्तीडोईतील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खडतर 'मार्ग'
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 27, 2022 | 8:28 AM

भंडारा : भंडाऱ्यात पावसाने रस्त्याची दुरावस्था केली आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. रस्ता पार करण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. भंडारा जिल्ह्यातल्या काही गावांत जाण्यासाठी आजही रस्ते नाहीत. यात पावसाने तर रस्त्याची पार दैना उडविली आहे. अशाच एका रस्त्यानेसुद्धा भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्रस्त करून सोडलेला आहे. तो रस्ता म्हणजे भंडारा तालुक्यातील हत्तीडोई ते मोहदुरा (Hattihoi-Mohadura) मार्ग. या मार्गावर तब्बल 5 किलोमीटरपर्यंत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यातही पडलेले खड्डे तर विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे हा रस्ता 15 वर्षापूर्वी तयार झाला आहे. अद्यापही या रस्त्याच्या डागडुजीचे सौजन्य प्रशासन दाखवताना दिसत नाही. त्यामुळं अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वेळीच रस्त्याच्या काळजी न घेतल्यास एखाद्या प्रवाश्यावर जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही. हा रस्त्याने प्रवास करताना अनेक अडचणी येत असल्याचं मुख्याध्यापिका तेजस्विनी टिचकुले, विद्यार्थिनी शुभलता लांजेवार (Shubhalata Lanjewar) तसेच गावकरी होमराज आकरे (Homraj Akare) यांनी सांगितलं.

शाळेत जाणारे विद्यार्थी त्रस्त

मोहदुरा ते हत्तीडोईचा मार्ग हा सध्या चिखलाने माखला आहे. पायी चालणे कठीण आहे. विद्यार्थी शाळेत जातात. अशावेळी रोज त्यांच्या ड्रेसवर चिखल उडतो. पावसाचे दिवस असल्यानं रोड ड्रेस धुणे शक्य नाही. त्यामुळं चिखलाने भरलेला ड्रेस घालून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळं सायकल चालविणे अतिशय जिकरीचे काम आहे. केव्हाही सायकल स्लीप होण्याचा धोका आहे. सायकलने जाणारे विद्यार्थी सायकल स्लीप होऊन पडल्यास सोबत दुसरा ड्रेस घेऊन जातात. कारण सायकलवरून पडल्यानंतर चिखलाने भरलेला ड्रेस कसा वापरणार?

शिक्षण, गावकऱ्यांचीही अडचण

या शाळेत बाहेरगावाहून शिक्षक येतात. अशावेळी दुचाकीनं प्रवास करणं जोखमीचं काम झालंय. कुठेही गाडी स्लीप होण्याचा धोका आहे. कित्तेकदा दुचाकीस्वार गाडी स्लीप होऊन पडतात, अशावेळी दुचाकीचालकांचीही पंचाईत होते. गावकरी शेतीच्या कामासाठी याच रस्त्याने येतात. बाहेरगावी जायचं म्हटलं तर दुसरा ड्रेस सोबत घेऊन गेल्याशिवाय प्रवास करणं कठीण आहे. असा हा मोहदुरा ते हत्तीडोईचा रस्ता केव्हा दुरुस्त होणार, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.