लाडकी बहीण योजना सुरु ठेवण्याचे सरकारपुढे मोठे आव्हान, काय आहेत अडचणी ?

राज्यात विधानसभा निवडणूकीत महायुतीवर मतांचा अक्षरश: वर्षाव झालेला आहे. १९७२ नंतर कोणत्या एका पक्षाला इतक्या जागा मिळालेल्या आहेत. बहिण माझी लाडकी या योजनेचा हा प्रभाव असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात गेमचेंजर ठरलेल्या या योजनेसाठी आता राज्याच्या तिजोरीवर मोठा भार येणार आहे. या विषयाचा घेतलेला आढावा...

लाडकी बहीण योजना सुरु ठेवण्याचे सरकारपुढे मोठे आव्हान, काय आहेत अडचणी ?
| Updated on: Nov 26, 2024 | 4:44 PM

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका २०२४ चे निकाल लागले असून महायुतीला या निवडणूकात मोठे बहुमत मिळाले आहे. भाजपा या निवडणूकात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असून भाजपाला एकट्याला १३२ जागा मिळालेल्या आहेत. तर महायुतीला २३६ जागा मिळालेल्या आहेत. महाराष्ट्रात १९७२ नंतर एखाद्या पक्षाला इतके मोठे यश मिळाले आहे. महायुतीला मिळालेल्या या मतामागे लाडकी बहिण योजनेचा मोठा हात असल्याचे म्हटले जात आहे. महिलांचे मतदान महायुतीला मिळल्यामागे ही योजना कारणीभूत ठरली आहे. महायुतीने आपल्याला निवडून आणले तर र या योजनेंतर्गत मिळणारी रक्कम २१०० करणार असल्याचे वचन दिलेले आहे. त्यामुळे आता ही योजना सुरु ठेवणे हे सरकारला बंधनकारक ठरणार आहे. महाराष्ट्रात मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महायुती सरकारने २८ जून २०२४ रोजी मंजूर केली होती. या योजनेनुसार महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये थेट बॅंक खात्यात देण्याची...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा