AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच इमारतीचा अर्धा भाग या प्रभागात, तर दुसरा भाग त्या प्रभागात; पालिकेच्या अजब गजब प्रभाग रचनेला भाजपचा कडाडून विरोध

मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. पालिकेची निवडणूक लांबणीवर पडणार असली तरी महापालिकेने मात्र प्रभाग रचनेचं काम पूर्ण केलं आहे.

एकाच इमारतीचा अर्धा भाग या प्रभागात, तर दुसरा भाग त्या प्रभागात; पालिकेच्या अजब गजब प्रभाग रचनेला भाजपचा कडाडून विरोध
| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 6:25 PM
Share

मुंबई: मुंबई महापालिकेवर (bmc) प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. पालिकेची निवडणूक लांबणीवर पडणार असली तरी महापालिकेने मात्र प्रभाग रचनेचं काम पूर्ण केलं आहे. या प्रभाग रचनेवर नगरसेवक आणि मुंबईकर (mumbaikar) नागरिकांनी हरकती आणि सूचना नोंदवल्या आहेत. तर, भाजपने (bjp) या प्रभाग रचनेला कडाडून विरोध केला आहे. प्रभाग रचना करताना कोणतंही तारतम्य पाळण्यात आलेलं नाही. एकाच इमारतीचा अर्धा भाग एका प्रभागात तर दुसरा भाग दुसऱ्याच प्रभागात दाखवण्यात आला आहे. एक प्रभाग तर रेल्वेची हद्द ओलांडून करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रभाग पाच किलोमीटरचा झाला आहे. त्यामुळे नगरसेवकांना कामे करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे, असा आक्षेप भाजपने नोंदवला आहे.

मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्रं लिहून हा आक्षेप नोंदवला आहे. सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. नवीन प्रभाग रचनेचा ड्राफ्ट चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आला आहे. नियमानुसार नाला, मोठे पूल, मोठे रस्ते, रेल्वे आधी सीमारेषा ठरवल्या गेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 31 मध्ये नाल्या ऐवजी एक छोटी गल्ली बॉण्ड्री ठरवण्यात आली आहे. एका इमारतीला दोन प्रभागांमध्ये विभागण्यात आले आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन मतदानाचा टक्का कमी होऊ शकतो, असं प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे.

म्हणून वार्डाचे विभाजन केले

प्रभाग क्रमांक 109 मध्ये रेल्वेची हद्द ओलांडून प्रभाग बनवण्यात आला आहे. यामुळे हा प्रभा 5 किलोमीटर लांबीचा झाला आहे. यामुळे नागरिकांना पालिकेच्या सेवा मिळवण्यासाठी रेल्वेची हद्द ओलांडून यावे लागेल, असं सांगतानाच भाजपच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यामुळे अशा प्रकारे वार्डाचे विभाजन करण्यात आले आहे, असा आरोप देखील शिंदे यांनी केला आहे.

राजकीय पक्षांना अडचणीत आणण्यासाठी प्रभाग रचना

नव्याने बनवण्यात आलेला प्रभाग क्रमांक 30 हा नॉर्थ आणि पी साऊथ या दोन वार्डामध्ये विभागण्यात आला आहे. यामुळे येथील नागरिकांना नागरी सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहेत. प्रभाग क्रमांक 164 हा चार विधानसभा क्षेत्रांमध्ये विभागण्यात आला आहे. यामुळे निवडून आलेले नगरसेवक तसेच आमदार यांना या ठिकाणी सोयीसुविधा देताना अडचणी निर्माण होणार आहेत. राजकीय पक्षांना अडचणीत आणण्यासाठी अशाप्रकारे प्रभाग रचना करण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

नियमांची ऐसी तैसी

प्रभाग क्रमांक 44 मध्ये एका सोसायटीला दोन प्रभागांमध्ये विभागण्यात आले आहे. या सोसायटीमधील चार बुथ प्रभाग क्रमांक 38 मध्ये तर 10 बूथ प्रभाग क्रमांक 43 मध्ये विभागण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 227 आणि 148 च्या सीमारेषा 67 टक्क्याहून अधिक बदलण्यात आल्या आहेत. तसेच प्रभाग क्रमांक व 69 प्रभागामध्ये इतर व विभाग समावेश करून त्या प्रभागांमधील लोकसंख्या व मतदार संख्या वाढवण्यात आली आहे. यामुळे या प्रभागांमधील लोकसंख्येच्या प्रभागांत नियम डावलण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

शेवटच्या दिवशी वसईपासून उल्हासनगरपर्यंत प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; अनेकांचा हद्दींवर आक्षेप!

केडीएमसीच्या प्रभाग रचनेत घोळात घोळ, उल्हासनगरचा काही भाग दाखवला केडीएमसीत; आमदार गायकवाड म्हणतात…

आदिवासी पाड्यावर घरकूल योजना राबवा, अनुसूचित जाती, जमाती आयोगाच्या म्हाडा, केडीएमसीला सूचना

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.