Vidhan Parishad : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी रेस, आमचाच विरोधी पक्षनेता व्हावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी

| Updated on: Jul 17, 2022 | 4:40 PM

या रेसमध्ये आता काँग्रेस (Congress) ही उतरली आहे, विरोधी पक्षनेता हा आमचाच व्हावा अशी मागणी काँग्रेसकडूनही पुढे करण्यात आलेले आहे.

Vidhan Parishad : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी रेस, आमचाच विरोधी पक्षनेता व्हावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी रेस, आमचाच विरोधी पक्षनेता व्हावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबई : राज्यात सरकार बदलल्यानंतर आता विरोधी पक्षनेते पदासाठी (Leader of Opposition) असणारी रेस वाढलेली दिसू लागली आहे. विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला देण्यात आलेलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे विधान सभेतील विरोधी पक्षनेते म्हणून विराजमान झालेले आहेत. विविध मुद्द्यांवरून ते सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. सर्वात आधी या पदासाठी शिवसेनेकडून दावा करण्यात आला, त्यासाठी एका नेत्याचं नावही चर्चेत आलं. त्यानंतर राष्ट्रवादीनेही विरोधी पक्ष नेता आमचा व्हावा अशी मागणी केली. तर  या रेसमध्ये आता काँग्रेस (Congress) ही उतरली आहे, विरोधी पक्षनेता हा आमचाच व्हावा अशी मागणी काँग्रेसकडूनही पुढे करण्यात आलेले आहे.

विरोधी पक्षनेता आमचाच व्हावा, काँग्रेसची मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत ही मागणी ठेवली आहे, याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, खालच्या सभागृहामध्ये आमचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यामुळे वरच्या सभागृहात आमचा विरोधी पक्ष नेता व्हावा ही आमची मागणी राहणार आहे. आमचे नेते आणि सीएलपी बाळासाहेब थोरात हे या सगळ्या गोष्टींबाबत दोन्ही पक्षांसोबत आणि नेत्यांसोबत चर्चा करतील, अशी प्रतिक्रिया यावेळी नाना पटोले यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?

गेल्या सरकारमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद हे भाजपकडे होते. प्रवीण दरेकर हे भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून खिंड लढवत होते. आता सरकार बदलल्यानंतर सर्वात आधी या पदावर शिवसेनेने दावा केला, त्यासाठी शिवसेना नेते अनिल परब यांचे नाव ही चर्चेत आले. त्यानंतर राष्ट्रवादीने ही या पदावर दावा करत एकनाथ खडसे यांचे नाव चर्चेत आलं. तर आता नाना पटोले यांनी मागणी ठेवल्याने काँग्रेस कडून कुणाचं नाव पुढे येणार हेही पाहणे तितकच महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसकडून अजून कोणतेही नाव जाहीर करण्यात आलं नाही .मात्र लवकरच त्याबाबत ही माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे. मात्र या पदावरून आता तिन्ही पक्षांमध्ये खटके उडण्याची ही शक्यता आहे. आता हे विरोधी पक्षनेते पद कुणाकडे जाणार? हे आगामी काही दिवसात कळेलच.