AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mansukh Hiren Death Case: मनसुख हिरेन प्रकरणी ATS ची धक्कादायक थेअरी, कोड्यात टाकणारे 5 मुद्दे

मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक अर्थात ATS करत आहे.

Mansukh Hiren Death Case: मनसुख हिरेन प्रकरणी ATS ची धक्कादायक थेअरी, कोड्यात टाकणारे 5 मुद्दे
Mansukh Hiren
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 09, 2021 | 11:28 AM
Share

मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक अर्थात ATS करत आहे. ATS ने आपल्या प्राथमिक अहवालात हिरेन यांच्या हत्येचा संशय व्यक्त केलाय. ATS ने आतापर्यंत जो तपास केलाय त्या माहितीच्या आधारे हा संशय व्यक्त केल्याचं एका ATS अधिकाऱ्यांने सूत्रांना सांगितलं. (Mansukh Hiren Death Case ATS theory 5 Shocking points)

काय आहेत ATS चे 5 धक्कादायक खुलासे…??

1) मनसुख हिरेन दोन मोबाईल वापरत होते. मृत्यूच्या अगोदर 30 मिनिटे दोन्ही मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणांहून स्वीच ऑन आणि स्वीट ऑफ करण्यात आले. एका मोबाईचं लोकेशन वसईतलं मांडवी तर एकाचं लोकेशन तुंगारेश्वर… या दोन्ही ठिकाणांचं अंतर साधारण 8 ते 10 किमीचं आहे. त्यांचा मृत्यू त्यांचे दोन्ही मोबाईल स्वीच ऑफ आणि स्वीच ऑन होण्याआधी झाला असावा. मग त्यांचा मृतदेह तुंगारेश्वरला नेण्यात आला असावा, असा एटीएसला संशय आहे. हे दोन्ही मोबाईल मुद्दामहून वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑन आणि ऑफ करण्यात आले कारण त्यांना पोलिस आणि हिरेन कुटुंबाला शोधकार्यात व्यक्त ठेवायचे होते.

2) आत्महत्या करणारी व्यक्ती कोरोनाच्या भीतीने तोंडावर मास्क किंवा रुमाल लावते, हे न पटणारे आहे. त्यामुळे हिरेन यांची हत्या झाल्याचा सशय बळावतो आहे, असं एटीएसच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

3) हिरेन यांच्या तोंडात रुमालाचे बोळे होते कारण त्यांच्या तोंडावाटे त्यांच्या शरीरात पाणी जाऊ नये. जर पाणी गेलं असतं तर काही वेळातच त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगला असता. उशीरा त्यांच्या शरीरात पाणी जावं आणि मृतदेह जास्त काळ त्यांचा पाण्यात रहावा जेणेकरुन मारेकऱ्यांना पळण्यास जास्त वेळ लागेल आणि पुरावेही नष्च करण्यास वेळ मिळेल.

4) एटीएसला सगळ्यात मोठा संशय आहे की हिरेन यांचा मृतदेह पाण्यात फेकण्याआधी त्यांचा मृत्यू 12 ते 16 तास अगोदर झालेला असावा. तसंच ज्या ठिकाणी त्यांचा मृतहेद मिळाला तिथे तो काही तास अगोदर फेकण्यात आला असावा.

5)हिरेन यांना अगोदर मारण्यात आलं असावं आणि त्यानंतर त्यांचा मृतहेद मुंब्र्याच्या रेतीबंदर येथे फेकून देण्यात आला असावा. दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल ऑन ऑफ करण्याचं तंत्र हा तपास यंत्रणा भरकटवण्यासाठी केलेला भाग असावा, असा संशय ATS ला आहे.

(Mansukh Hiren Death Case ATS theory 5 Shocking points)

हे ही वाचा :

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास ‘एनआयए’ करणार; हिरेनप्रकरण एटीएसकडेच

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

Video: जिथं ‘त्या’ स्कॉर्पिओच्या मालकानं आत्महत्या केली तिथला व्हिडीओ जशास तसा

Follow Us
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट