सिटी सर्व्हे विभागाची फेरफार अदालत सोमवारी, नागपूर शहरातील नागरिकांची कोणती कामे होणार?

| Updated on: Feb 24, 2022 | 4:00 AM

राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सोमवारी, 28 फेब्रुवारी रोजी फेरफार अदालत नगर भूमापन अधिकारी क्रमांक दोन आणि तीन नागपूर, पाचवा व सहावा माळा, प्रशासकीय इमारत क्रमांक एक, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर येथे होणार आहे. संबंधित नागिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन नगर भूमापन अधिकारी स्वप्ना पाटील आणि सतीश पवार यांनी केले आहे.

सिटी सर्व्हे विभागाची फेरफार अदालत सोमवारी, नागपूर शहरातील नागरिकांची कोणती कामे होणार?
नागपुरात फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
Follow us on

नागपूर : कोविड-19 प्रादुर्भावामुळे व नामांतरासाठी बंधनकारक ऑनलाइन आज्ञावली (Online Algorithm) करण्यात आली. नामांतरण प्रकरणे प्रलंबित आहेत. यापैकी बऱ्याच प्रकरणात त्रुटी आहेत. त्यामुळं अशा प्रकरणामध्ये आवश्यक कागद पत्रांची समक्ष पूर्तता केली जाईल. नियमानुसार नामांतरण मंजूर व्हावेत, या हेतूने नगर भूमापन अधिकारी (Municipal Survey Officer) क्रमांक दोन व तीन नागपूर कार्यालयात 28 फेब्रुवारी रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित अर्जदाराने नगर भूमापन कार्यालयात सादर केलेल्या प्रकरणाची पोच-पावती आणावी. त्यांचे प्रकरणाशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या फोटोकॉपी सेट इत्यादीसह कार्यालयात हजर राहायचे आहे. फेरफार अदालतीचे (Ferfar Court ) अनुषंगाने उपस्थित होणारा संबंधित व अर्जदारास टोकन वाटप करण्यात येणार आहे.

जनतेची कामे व्हावीत

अर्जदारास त्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने संबंधीत परीक्षण भूमापन अधिकारी यांची भेटीची वेळ देण्यात येणार आहे. संबंधित परीक्षण भूमापक यांचे स्तरावरून प्रकरणांची तपासणी करून नियमान्वये कारवाई करणे गरजेचे करण्याचे नियोजित आहे. त्यानुसार उपस्थित होणाऱ्या सर्व अर्जदार यांनी शासनाच्या सूचनेनुसार कोविड नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. कार्यालयास ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार कामकाज करण्यासाठी कार्याला सहकार्य करावे. फेरफार अदालत ही जनतेची काम होण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेली आहे.

कोणकोणत्या सुविधा पुरवण्यात येणार

प्रलंबित प्रकरणाबाबत येणाऱ्या अर्जदार यांच्या अर्जाबाबत स्थिती सांगणे. त्रुटी असणाऱ्या प्रकरणात कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्वरित कार्यवाही करणे. अर्जदार यांना फेरफार मंजुरीकरिता नमुना नऊ नोटीस प्राप्त होईल. मुदत संपली असल्यास प्रकरणाची तत्काळ तपासणी करून त्वरित फेरफार मंजूर करण्यात येईल. ईपीसीआयएस ऑनलाईन फेरफार प्रणाली, मिळकत पत्रिका डाउनलोड करणे, डिजिटल फेरफार प्रणाली यांची माहिती पुरविली जाईल. नगर भूमापन अधिकारी क्रमांक दोन यांच्या संबंधित सर्व मौजे. नगर भूमापन अधिकारी क्रमांक तीन नागपूर संबंधित सीताबर्डी, हजारीपहाड, काचीमेट, गाडगा, धरमपेठ, फुटाळा, सोनेगाव टाकळी सिम. या भागातील अर्ज केलेल्या अर्जदारांनी उपस्थित राहावे. अधिक माहितीकरिता 0712- 2520263 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

Nagpur | महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यायामशाळेत काढला दम! मनपा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दिले संकेत

Nagpur | मेडिकलच्या अधिष्ठातापदाची अतिरिक्त जबाबदारी डॉ. राज गजभिये यांच्याकडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता व्हेंटिलेटरवर

नागपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी, प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर