गुन्हे कमी करण्यासाठी नागपूरमध्ये ‘क्यूआर कोड’, पोलिसांना घटनास्थळी जाऊन करावं लागणार पंचिंग

| Updated on: Aug 03, 2021 | 10:42 PM

वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञानचा वापर करत कंबर कसली आहे. नियमित गुन्हे घडणाऱ्या भागात पोलिसांनी क्यूआर कोड लावले आहेत.

गुन्हे कमी करण्यासाठी नागपूरमध्ये क्यूआर कोड, पोलिसांना घटनास्थळी जाऊन करावं लागणार पंचिंग
NAGPUR POLICE
Follow us on

नागपूर : वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करत कंबर कसली आहे. नियमित गुन्हे घडणाऱ्या भागात पोलिसांनी क्यूआर कोड लावले आहेत. या क्यूआर कोडमुळे चार्ली आणि बिट मार्शल यांना नेमून दिलेल्या ठिकाणी प्रत्यक्षपणे जाऊन पंचिंग करावी लागणार आहे. (police launches QR codes for police presenty to reduce crime in Nagpur)

शहरात पेट्रोलिंगसाठी चार्ली आणि बिट मार्शल आहेत

नागपुरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी नवी योजना आखली आहे. ज्या भागात जास्त प्रमाणात गुन्हे घडतात त्या भागात पोलिसांचा वावर वाढविण्याचा नागपूर पोलीस दलाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. नागपूर शहरात पेट्रोलिंगसाठी चार्ली आणि बिट मार्शल आहेत. यांच्यावर दिलेल्या परिसरात सतत पेट्रोलिंग करून गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासोबतच गुन्हेगारी संपवीण्याची जबाबदारी आहे. मात्र अनेकदा काही भागात पोलीस पोहोचतच नाहीत. याच कारणामुळे अनेक गुन्हे घडतात.

नेमून दिलेल्या ठिकाणी बिट मार्शल आणि चार्ली पोलिसांना जावं लागणार

गुन्हा घडूच नये यासाठी पोलिसांनी नवीन योजना आखली आहे. ज्या ठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे, अशी शहरातील 1500 ठिकाणं पोलिसांनी शोधली आहेत. या सर्व ठिकाणांवर नेमून दिलेल्या बिट मार्शल आणि चार्ली पोलिसांना जायचं आहे. तसेच या ठिकाणी जाऊन त्यांना स्कॅनिंग करावं लागणार आहे. स्कॅन करताच नेमून दिलेल्या ठिकाणी पोलीस पोहोचला आहे, याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळणार आहे.

पोलिसांना क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार 

क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार म्हणजे पोलिसाला नेमून दिलेल्या परिसरात जावंच लागणार. परिणामी पोलिसांचा संवेदनशील भागात सतत वावर असेल. ज्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसेल. सोबतच पोलिसांच्या कामाचे मूल्यमापनसुद्धा होणार आहे.

गुन्हे कमी होणार का ? 

शहरात पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असते हे खरं आहे. मात्र अनेकदा हे पेट्रोलिंग कागदावरच असते. परिसरात न पोहोचताच चार्ली आणि बिट मार्शल कुठे तरी थांबले असतात. मात्र नव्या यंत्राणेमुळे त्यांना दिलेल्या परिसरात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मात्र याचा किती फायदा होईल ते येणाऱ्या काळातच समजणार आहे.

इतर बातम्या :

लाखो-कोट्यवधींच्या कार, चोरीसाठी चक्रावून सोडेल अशा टेक्निकल पद्धतीचा वापर, अट्टल कारचोर अखेर जेरबंद

ना दागिने, ना पैसे, चोरट्यांनी चोरुन नेले चक्क खेकडे ! रत्नागिरीतील चित्रविचित्र चोरी, चर्चांना उधाण

पोलीस कोठडीतील आरोपीचा कंटनेरखाली चिरडून मृत्यू, अपघात की घातपात? नातेवाईकांचा सवाल

(police launches QR codes for police presenty to reduce crime in Nagpur)