Milk Rates: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात दुधाचे दर तब्बल 10 रुपयांनी वाढले? महागाईनं जगणं बेहाल!

Milk Rates hike in Maharashtra: महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात तब्बल 10 रुपयांनी (Milk rates hike by 10 Rupees) वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडण्याची दाट शक्यता आहे.

Milk Rates: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात दुधाचे दर तब्बल 10 रुपयांनी वाढले? महागाईनं जगणं बेहाल!
गोव्यातही दूधाच्या दरात वाढ झाली आहे.
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 6:08 PM

संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही महागाईच्या (Inflation in India) झळा बसत आहेत. एकीकडे इंधन दरवाढीनं (Fuel rates increase) डोकं वर काढलं आहेत. त्याचा थेट फटका हा भाज्यांचे दर, फळांचे दर, दळणवळणाची साधनं, या सगळ्यांवर झालेला आहेत. महागलेल्या इंधनासोबत आता सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी आणखी एक दरवाढ समोर आली आहे. रोजच्या वापरातून दुधाच्या किंमती महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात तब्बल 10 रुपयांनी (Milk rates hike by 10 Rupees) वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडण्याची दाट शक्यता आहे. यातही म्हशीचं दूध हे आता 70 रुपये लीटर इतक्या उच्चांकी दरांवर पोहोचलं आहे. तर दुसरीकडे गायीचं दूधही पन्नास रुपयांवर पोहोचलं आहे. इंधन, भाज्या, फळं आणि किराणा मालासोबत दुधाच्या वाढलेल्या किंमतींनी सामान्यांचं जगणं बेहाल केलंय. वाढत्या महागाईत दुधाचीही दरवाढ करण्यात आली आहे. त्याला कारणही महागाईच आहे.

कुठे झाली दरवाढ?

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात दुधाची दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनं नंदुरबारमधील लोकांना आता दूध खरेदीदरम्यान, तब्बल 10 रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. याचा फटका सामान्यांच्या खिशावर थेट होणार आहे.

किती झाले दर?

नंदुरबार जिल्ह्यातील सुट्या दुधाची किंमत 10 रुपयांनी वाढवण्यात आल्याची घोषणा प्रमुख दूध विक्रेत्यांनी केली आहे. त्यामुळे दुधाचे दर आता वाढून 50 आणि सत्तर रुपयांपर्यंत पोहोचले आहे. गायीच्या दुधाचे दर आधी 40 रुपये प्रतिलीटर इतके होते. मात्र आता वाढीव दरांनुसार ग्राहकांना गायीच्या एक लीटर दुधासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहे. दर म्हशीच्या दुधाची किंमत ही 60 रुपयांवर 70 रुपये प्रतिलीटर इतकी झाली आहे.

गायीचं दूध :

  1. आधीचे दर – 40 रुपये प्रतिलीटर
  2. आताचे दर – 50 रुपये प्रतिलीटर

म्हशीच्या दूधाचे दर :

  1. आधीचे दर – 60 रु. प्रतिलीटर
  2. आताचे दर – 70 रु. प्रतिलीटर

10 रुपयांची वाढ का?

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले. त्यासोबत जिवनावश्यक गरजेच्या वस्तूंचे ही दरही वाढलेत. त्यामुळे सगळ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. नंदुरबारमध्ये गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे दुधात भाववाढ करण्यात आली नव्हती. मात्र यंदा दुष्काळामुळे महागलेला चारा आणि त्यातच गायी म्हशीच्या ढेप आणि खाद्यपदार्थांचे दर महागल्यामुळे दुधाच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत, असं दूध विक्रेत्यांनी म्हटलंय. त्यामुळे इंधन, तेल, किराणामालापाठोपाठ गरेजच्या दुधासाठी आता सर्व सामान्यांना खिशावर अतिरीक्त भार पडणार आहे.

संबंधित बातम्या :

13 दिवसांत पेट्रोल 8 रुपयांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा पेट्रोल डिझेलचा भाव

दोघांच्या भांडणात बँकांचे कोट्यवधींचे नुकसान… कोण आहेत ते दोन धनाढ्य…

Gautam Adani: 100 बिलियन डॉलर क्लबमध्ये अदानींची दणक्यात इन्ट्री! अंबानींना पछाडलं, संपत्तीत घसघशीत वाढ

पाहा महाराष्ट्रातली महत्त्वाची बातमी:

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.