उल्हासनगरात दिराची वहिनीला मारहाण; मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंदूमल रहेजा यांची हातगाडी आहे. आज उल्हासनगर महापालिकेच्या वतीने अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई सुरू असताना चंदूमल यांच्याही हातगाडीवर कारवाई करण्यात आली.

उल्हासनगरात दिराची वहिनीला मारहाण; मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
उल्हासनगरात दिराची वहिनीला मारहाण;

उल्हासनगर : हातगाडीची पालिकेत तक्रार केल्याच्या संशयावरून दिराने आपल्या वहिनीला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चंदूमल रहेजा असे मारहाण करणाऱ्या दिराचे तर अंजली रहेजा असे मारहाण झालेल्या वहिनीचे नाव आहे. या घटनेनंतर अंजली यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अंजली यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत उल्हासनगर पोलिसांनी चंदूमल रहेजा आणि दिनेश रहेजा या दोघांना अटक केली आहे. (Brother in law beaten daughter-in-law in Ulhasnagar; The video went viral on social media)

काय आहे प्रकरण?

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंदूमल रहेजा यांची हातगाडी आहे. आज उल्हासनगर महापालिकेच्या वतीने अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई सुरू असताना चंदूमल यांच्याही हातगाडीवर कारवाई करण्यात आली. या हातगाडीजवळच चंदूमल यांची वहिनी अंजली रहेजा यांचं दुकान आहे. त्यामुळे अंजली यांनीच आपल्या हातगाडीची तक्रार पालिकेत केल्याचा संशय चंदूमल यांना आला. त्यातून त्यांची आणि अंजली यांची वादावादी होऊन चंदूमल आणि त्यांचा मुलगा दिनेश या दोघांनी मिळून अंजली रहेजा यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

सासऱ्याचे सूनेवर वार, घर पेटवून गळफास घेत आत्महत्या

बदलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याने आधी सुनेच्या डोक्यात वार केले, आणि मग घर पेटवून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं बदलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सासऱ्याने आधी सूनेवर नेमके वार का केले? या घटनेमागे नेमकं कारण काय, त्यांच्यात वाद कोणत्या विषयावर झाले होते? असा सवाल आजूबाजूच्या स्थानिकांना पडत आहेत.

नेमकं काय घडलं?

बदलापूर पश्चिमेच्या शनिनगर परिसरातील हेरंब सृष्टी अपार्टमेंटमध्ये किसन जाधव हे मुलगा, सून, नात आणि नातू यांच्यासह वास्तव्याला आहेत. बुधवारी (13 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास जाधव यांचा मुलगा कामावर गेला होता, तर मुलाची दोन्ही मुलं बाहेर गेली होती. यावेळी किसन जाधव आणि त्यांची सून असे दोघेच घरात असताना या दोघांमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाले. या वादात जाधव यांनी सुनेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. यानंतर सुनेनं आरडाओरडा केल्यानं शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली आणि सुनेला रुग्णालयात नेलं. (Brother in law beaten daughter-in-law in Ulhasnagar; The video went viral on social media)

इतर बातम्या

सोलापुरातील सिद्धेश्वर वन विहारातील अडीच लाखाच्या पोपटाचा मृत्यू

पोटच्या मुलाने पित्याच्या डोक्यात पार घातली, रक्तबंबाळ पित्याचा तडफडून मृत्यू, सांगलीतील वेदनादायी घटना

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI