रायगडाच्या राजसदरेवरील बॅरिकेट्स हटवले, आता महाराजांच्या चरणापाशी नतमस्तक होता येणार

रायगडावरील राजसदरेवर असलेल्या पुतळ्यासमोर पुरातत्व विभागाकडून बॅरिकेट्स लावण्यात आले होते. मात्र, सोमवारी हे बॅरिकेट्स हटवण्यात आले आहेत.

रायगडाच्या राजसदरेवरील बॅरिकेट्स हटवले, आता महाराजांच्या चरणापाशी नतमस्तक होता येणार
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 9:21 PM

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील राजसदरेवर असलेल्या पुतळ्यासमोर पुरातत्व विभागाकडून बॅरिकेट्स लावण्यात आले होते. मात्र, सोमवारी हे बॅरिकेट्स हटवण्यात आले आहेत. तशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. हे बॅरिकेट्स पुरातत्व खात्याच्या सहमतीनं हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आता राजसदरेवर जाऊन महाराजांपुढे नतमस्तक होता येणार आहे.(The barricades in front of the statue of Shivaji Maharaj at Raigad were removed)

“आज रायगडच्या राजसदरेवरील बँरिकेटस् पुरातत्त्व खात्याच्या सहमतीने हटविण्यात आले. राजसदरेवर जाऊन महाराजांपुढे नतमस्तक होता यावे, यासाठी सदरेवरील बँरिकेटस् काढावेत, अशी मागणी शिवभक्तांनी अनेक दिवसांपासून केली होती”, असं ट्वीट खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी महाराजांच्या चरणी नतमस्तक झालेले 2 फोटोही जोडले आहे.

हे बॅरिकेट्स हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून लाखो शिवभक्तांकडून करण्यात येत होती. आज अखेर हे बॅरिकेट्स हटवल्यामुळे शिवभक्तांना महाराजांच्या समोर नतमस्तक होता येणार आहे. दरम्यान, महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असताना काही शिष्टाचाराचं पालन करणं गरजेचं असल्याचंही संभाजीराजे यांनी सांगितलं आहे. “काही शिष्टाचारांचे पालन करणे गरजेचे आहे. जसे की डाव्या बाजूने सदरेवर जाऊन उजव्या बाजूने उतरणे, महाराजांच्या तख्ताच्या जागेपर्यंत न जाणे, सेल्फी न काढणे, सदरेवर शांतता राखणे या गोष्टी प्रामुख्याने पाळल्या पाहिजेत”, असं संभाजीराजे यांनी म्हटलं.

त्याचबरोबर “तूर्तास सदरेवरील बँरिकेट्स तख्ताच्या बाजूने लावले आहेत, मात्र लवकरच या बँरिकेटस् चे स्वरूप बदलून ऐतिहासिक धाटणीची संरचना करण्यात येईल. या निर्णयास संमती देऊन पुरातत्त्व विभागाने दाखविलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार!” अशा शब्दात संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याचे आभारही मानले आहेत.

संबंधित बातम्या :

शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या प्रकाशव्यवस्थेवरुन खासदार संभाजीराजे नाराज! पुरातत्व खात्याला फटकारलं

शिवजयंती धडाक्यात साजरी करणारच; शिवसेना भवनासमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी

The barricades in front of the statue of Shivaji Maharaj at Raigad were removed

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.