
अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. अमेरिकेनं टॅरिफ लावल्यानंतर भारताची चीन आणि रशियासोबतची जवळीक वाढत आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या काही महिन्यांमध्ये भारताची चीनसोबतची निर्यात वाढली आहे, तर अमेरिकेसोबत होणारी निर्यात कमी झाली आहे. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीनने तीव्र प्रतिक्रिया देत या निर्णयाचा निषेध देखील केला होता. आम्ही भारतासोबत आहोत, आम्ही भारतीय वस्तूंचं आमच्या बाजारपेठेत स्वागत करू असं चीनने म्हटलं होतं. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चीनचा दौरा केला होता. एकीकडे चीन आणि भारत यांची मैत्री वाढत असल्याचं बोललं जात असताना आता धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनने भारतासोबत डबल गेम खेळल्याचं समोर आलं आहे.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा एक रिपोर्ट समोर आला आहे, त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे, या रिपोर्टनुसार आता चीन आणि पाकिस्ताननं भारतासोबत थेट युद्ध न करता नव्या रणनीतीचा अवलंब केला आहे. ज्याला ‘ग्रे-झोन वॉर फेअर’ असं म्हटलं जातं. या रणनीतीनुसार भारताविरोधात थेट युद्ध न करता, अशा काही कारवाया करायच्या ज्यामुळे भारतावर दबाव निर्माण होईल. मात्र हे सर्व करत असताना थेट युद्ध टाळायचं अशी ही नीती आहे. एका वृत्त वाहिनीच्या रिपोर्टानुसार ऑपरेशन सिंदूरमध्ये चीन आणि पाकिस्तानची हीच नीती दिसून आली.
भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनने पाकिस्तानला पुढे केलं होतं, मात्र या सर्वा प्रकरणात चीन पाकिस्तानच्या पाठिमागं भक्कमपणे उभा असल्याचा दावा अमेरिकेच्या या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेकडून प्राप्त रिपोर्टनुसार भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून जो हल्ला करण्यात आला होता, त्यात पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत झाली होती, मात्र हे सर्व हल्ले भारतानं परतून लावले होते, भारतानं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं.