Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येची उसळी, तब्बल 7 महिन्यानंतर ओलांडला 3 लाखांचा टप्पा, 491 जणांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये 3 लाख 17 हजार 532 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येची उसळी, तब्बल 7 महिन्यानंतर ओलांडला 3 लाखांचा टप्पा, 491 जणांचा मृत्यू
CORONA TESTING
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 9:34 AM

नवी दिल्ली: कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. बुधवारच्या रुग्णसंख्येनं तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासात 3 लाख 17 हजार 532 रुग्णांची नोंद झाली आहे. मृतांची संख्या देखील वाढली असून दिवसभरात 491 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. दिवसभरात 2 लाख 23 हजार 990 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 19 लाख 24 हजार 051 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हीटी रेट 16.41 वर आला आहे. देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 9287 वर गेली आहे.

कोरोना रुग्णांची तीन लाखांच्या पार

गेल्या 24 तासात 2 लाख 23 हजार 990 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी 3 लाख 17 हजार 532 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात 491 जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

ओमिक्रॉन बाधितांची संख्या 9 हजारांच्या पार

देशातील ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 9 हजार 287 वर पोहोचली आहे. राज्यात बुधवारी ओमिक्रॉनच्या 214 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात 158, मुंबईतील 31 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2074 वर पोहोचली आहे. तर, 1091 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची स्थिती काय?

बुधवारी राज्यात 43 हजार 697 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 46 हजार 591 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 69 लाख 25 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

इतर बातम्या:

Corona Updates:  मराठवाड्यात कोरोनाचे उग्र रुप, औरंगाबादेत 24 तासात हजाराचा आकडा पार, इतर जिल्ह्यात काय स्थिती?

Weather Alert : कोकण मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, मुंबईत थंडी कायम

Corona virus cases India 317532 new cases and 491 deaths reported in the last 24 hours omicron variant cases crosses nine thousand