PHOTO | ‘मराठी रंगभूमीने प्रेक्षकांचं प्रेम तर दिलच पण अनेक आनंदाचे क्षणही दिले’, प्रशांत दामलेंनी शेअर केले खास फोटो!

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही मंचावर आपल्या अभिनयाची जादू पसरवणाऱ्या अभिनेता प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलंय.

1/5
चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही मंचावर आपल्या अभिनयाची जादू पसरवणाऱ्या अभिनेता प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं.
2/5
आज (31 मे) एका खास निमित्ताने प्रशांत दामले यांनी काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/5
प्रशांत दामले यांनी शेअर केलेले हे फोटो त्यांचे गाजलेले नाटक ‘एका लग्नाची गोष्ट’ दरम्यानचे आहे. त्यांच्या या नाटकाचे 1000 प्रयोग पूर्ण झाले तेव्हा या खास प्रयोगाला महानायक अमिताभ बच्चन, दिवंगत नेते आर.आर.पाटील, अभिनेते विक्रम गोखले यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती.
4/5
‘मराठी रंगभूमीने प्रेक्षकांच प्रेम तर दिलच पण अनेक आनंदाचे क्षणही दिले.. त्यातलाच हा एक क्षण..एका लग्नाची गोष्ट.. 1000 वा प्रयोग..दिनानाथ नाट्यगृह..एका लग्नाची गोष्ट चे एकूण 1800 प्रयोग झाले,’ असे म्हणत त्यांनी या आठवणी शेअर केल्या आहेत.
5/5
अभिनेते प्रशांत दामले अशा खास आठवणी आपल्या प्रेक्षकांसोबत नेहमी शेअर करत असतात. त्यांच्या ‘बहुरूपी’ या नाटकाच्या 100व्या प्रयोगाला अभिनेते नाना पाटेकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. याचाही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.