Marathi News » Photo gallery » Chanakya Niti If you make these mistakes in life, the enemy will take advantage of it
Chanakya Niti : आयुष्यात या चुका कधीच करू नका, शत्रू त्यांचा गैरफायदा नक्कीच घेईल…
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, Tv9 मराठी
Updated on: Aug 29, 2022 | 2:20 PM
शत्रूकडून पराभूत होण्याच्या भीतीने अनेक वेळा लोक संयम गमावतात आणि भांडणे करतात. चाणक्य नीती सांगते की, रागामध्ये कधीही कोणतेही निर्णय आपण घेतले नाही पाहिजेत. आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही कितीही बलवान असलात तरी शत्रूला स्वतःहून कमी समजण्याची चूक कधीही करू नका. तसेच आपल्या कमकुवत गोष्टी आपल्या शत्रूला कळू देऊ नका.
Aug 29, 2022 | 2:20 PM
आचार्य चाणक्य यांनी शत्रूसमोर कोणत्या चुका करणे आपण टाळले पाहिजे, यावर सविस्तरपणे सांगितले आहे. कारण काही चुका जर आपण आपल्या शत्रूसमोर केल्या तर त्यांचा तो गैरफायदा नक्कीच घेऊ शकतो. चाणक्य नीतीनुसार आपण जीवनात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.
1 / 5
अनेक वेळा शत्रूसमोर स्वत:ला असहाय दाखवण्याची चूक लोक करतात. ही एक प्रकारची मोठी चूक आहे, ज्याचा परिणाम तुम्हाला कमकुवत बनवू शकतो. यामुळे जरी आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तरीही आपण हे शत्रूला कधीच दाखवले नाही पाहिजे.
2 / 5
चाणक्य म्हणतात की, तुम्हाला कोणत्याही युद्धात विजय मिळवायचा असेल तर नेहमी शांत मनाने पुढे जावे. अनेकदा लोक रागाच्या भरात चुकीची पावले उचलतात. जे शत्रूसाठी फायदेशीर ठरते.
3 / 5
शत्रूकडून पराभूत होण्याच्या भीतीने अनेक वेळा लोक संयम गमावतात आणि भांडणे करतात. चाणक्य नीती सांगते की, रागामध्ये कधीही कोणतेही निर्णय आपण घेतले नाही पाहिजेत.
4 / 5
आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही कितीही बलवान असलात तरी शत्रूला स्वतःहून कमी समजण्याची चूक कधीही करू नका. तसेच आपल्या कमकुवत गोष्टी आपल्या शत्रूला कळू देऊ नका.