
शुक्रवारी रात्री अर्जुन कपूरचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ज्यामध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली. रणबीर कपूरही पार्टीत पोहोचला होता. आलियादेखील त्याच्यासोबत होती.

रणवीर सिंग नेहमीप्रमाणेच आपल्या हटके लूकमध्ये दिसला. फ्लोरल शर्ट आणि काळी टोपी घालून त्यानं स्वत: गाडी चालवत हजेरी लावली.

साऊथचा स्टार विजय देवेराकोंडाही पार्टीत पोहोचला. जेव्हापासून विजयनं बॉलीवूडमध्ये डेब्यू फिल्म लाइगर साइन केला आहे, तेव्हापासून तो बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर अनेक पार्ट्या करताना दिसतो आहे.

जान्हवी आणि खुशी कपूर सुद्धा एकत्र पार्टीत पोहोचल्या. दोन्ही बहिणी भाऊ अर्जुन कपूरवर खूप प्रेम करतात आणि त्याच्यासोबत खूप पार्टी करत असतात.