
अभिनेत्री रकुल प्रीत आणि अभिनेता आणि प्रोड्युसर जॅकी भगनानी हे दोघे लवकरच लग्नबंधनात अटकणार आहेत. रकुल आणि जॅकी यांचं गोव्यात होणार लग्न असल्याची माहिती आहे.

येत्या 21 फेब्रुवारीला रकुल आणि जॅकी डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची माहिती आहे. 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दोघांचे लग्नाचे फंक्शन्स पार पडणार आहेत.

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जॅकी आणि रकुल लग्नगाठ बांधतील. कुटुंबातील लोक आणि मोजके नातेवाई- मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत या दोघांचा विवाह पार पडणार आहे.

22 फेब्रुवारीला मुंबईत रिसेप्शन ठेवण्यात येणार आहे. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत.

सलमान खान, अजय देवगन, अक्षय कुमार, टाइगर श्रॉफ, करण जौहर, अनिल कपूर, अरशद वारसी, नागा चैतन्य, आयुष्मान खुराना, मनुषी छिल्लर, करिश्मा कपूर, अल्लू अर्जुन, राम चरण, महेश बाबू आणि देविड धवन यांच्यासह अन्य मान्यवर रिसेप्शनला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.