
जेव्हा राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू श्रेयस गोपाल आयपीएल 2021 मध्ये व्यस्त होता, तेव्हा त्याची सुंदर मंगेतर निकिता शिव तिच्या मित्रांसह गोव्याला रवाना झाली.

श्रेयस गोपालची मंगेतर निकिता शिवने लग्नापूर्वी बॅचलर पार्टी करण्यासाठी गोवा गाठलं आहे. ती तिच्या हॉट लूकने चाहत्यांना वेड लावत आहे.

निकिता शिवला प्रवासाची खूप आवड आहे. ती अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करते.

निकिता शिवने मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेंगळुरूमध्ये अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम केलं. यानंतर तिने द मन नेटवर्क नावाची कंपनी सुरू केली.

श्रेयस गोपालने त्याची मैत्रीण निकिता शिवला 11 ऑगस्ट 2021 रोजी अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केलं होतं, त्यानंतर त्याची आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सनेही त्याचे अभिनंदन केले.

श्रेयस गोपाल आणि निकिता शिव आयपीएल 2021 नंतर लग्न करतील अशी अपेक्षा आहे.