
कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रोहित पवारांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

पत्नी कुंती पवार यांच्या सोबतचे खास फोटो रोहित पवारांनी शेअर केलेत. माझ्या आयुष्यातली सर्वात विश्वासू साथीदार..., असा उल्लेख रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

आयुष्याच्या प्रवासात सुखाची बेरीज, दुःखाची वजाबाकी, संकटाचा भागाकार आणि आनंदाचा गुणाकार करणारा सर्वांत विश्वासू साथीदार असलेली माझी life partner कुंतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या भरगच्च शुभेच्छा!!!, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

कुंतीची आश्वासक साथ आणि हातातला विश्वासाचा घट्ट हात असाच कायम राहो, ही प्रार्थना!, असंही रोहित पवारांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. रोहित पवार आणि कुंती पवार यांच्यावर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कुंती या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतिश मगर यांच्या कन्या आहेत. 2012 ला कुंती आणि रोहित यांचा विवाह झाला. आज त्यांच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस आहे. आनंदिता आणि शिवांश ही दोन मुलं त्यांना आहेत.