मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Congress leader and MP Rahul Gandhi) यांच्याकडे ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी केलेल्या चौकशी विरोधात राज्यभर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून चौकशी विरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. केंद्रातील भाजपचे मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि नेते खासदार राहुलजी गांधी यांचा आवाज दडपू पहात आहे. ईडीने (ED) राहुलजी गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी केली असून पुन्हा चौकशीला बोलावले आहे. चौकशीच्या नावाखाली राहुलजी गांधी यांचा मोदी सरकार छळ करत आहे. भाजप सरकारच्या या दडपशाहीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून राज्यभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा व आंदोलन करून मोदी सरकारविरोधात (Modi government) जोरदार घोषणाबाजी केली.