Dhananjay Munde : ‘संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत, त्यांना….’, धनंजय मुंडे थेट बोलले

Dhananjay Munde : राज्य सरकारमध्ये मंत्री असणारे धनंजय मुंडे संत वामनभाऊ यांच्या 49 व्या पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल प्रश्न विचारले. त्यावर बोलताना त्यांनी न्यूज चॅनलचा टीआरपी, जाहीराती रेट काढला.

Dhananjay Munde : संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत, त्यांना...., धनंजय मुंडे थेट बोलले
Dhananjay Munde
| Updated on: Jan 22, 2025 | 10:54 AM

सध्या राज्यात चर्चेचा विषय बनलेले आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी संत वामनभाऊ यांच्या समाधीच दर्शन घेतलं. ते 49 व्या पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी मीडियाशी संवाद साधला. “मी 25 वर्ष इथे येतोय. हे माझं 25 वं वर्ष आहे. आदरणीय विठ्ठलबाबांनी मला आदेश दिला. पुण्यतिथीची महत्त्वाची पूजा आहे. माझ्या हस्ते ही पूजा होतेय. पुण्यातिथीच्या आदल्यादिवशी मी या गडावर मुक्कामी असतो. आज व्यवस्थित, चांगली पूजा झाली. ही पूजा करुन खरी ऊर्जा, प्रेरणा मिळते. समाजकारण, राजकारण लोकांची सेवा करायची ताकद घेऊन पुढे निघालो आहे” असं धनंजय मुंडे म्हणाले. हे पुण्यतिथीच 49 व वर्ष आहे.

देवासमोर काय साकडं घातलं? यावर धनंजय मुंडे म्हणाले की, “देवासमोर आपण नतमस्तक होतो, आपण ज्या क्षेत्रात काम करतो, देवाने आज्ञा दिली आहे. आपल्या हातून लोकांची सेवा घडो, ती सेवा यशस्वी लोकांची घडो. गरीबातल्या गरीब माणसाची सेवा आपल्या हातून घडो, हेच माथा टेकून मागितलं”

संतोष देशमुख प्रकरणावर धनंजय देशमुख काय म्हणाले?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाबद्दल त्यांना विचारण्यात आलं. तुरुंगात असलेल्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना वेगळी ट्रीटमेंट मिळतेय असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. त्यावर धनंजय मुंडे बोलले. “या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही. मला प्रश्न विचारु नका. मी स्पष्टपणे सांगितलय, जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे हत्यारे आहेत, त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. त्यांना तात्काळ फाशी द्या. कोणी काय म्हणावं हा विषय वेगळा. तुम्हाला बातमी, टीआरपी पाहिजे. त्याशिवाय जाहीराती मिळत नाहीत, जाहीरातीला रेट मिळत नाही. पोलिसांकडून योग्य तपास सुरु आहे” असं धनंजय मुंडे म्हणाले.

वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड हाच या गुन्ह्यात मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. त्याच्यावर सुद्धा मकोका लावण्यात आलाय. पण वाल्मिक कराडला हत्या प्रकरणात अटक झालेली नाही. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा आहे.