‘या लोकांना महत्व देण्याची गरज नाही’, आमदार रोहित पवारांचं नितेश राणे आणि सदाभाऊ खोतांना प्रत्युत्तर

रोहित पवारांच्या या दौऱ्यावरुन माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार नितेश राणे यांनी रोहित पवारांना टोले लगावले आहेत. राणे आणि खोतांच्या या टोलेबाजीला आता रोहित पवारांनीही उत्तर दिलंय.

'या लोकांना महत्व देण्याची गरज नाही', आमदार रोहित पवारांचं नितेश राणे आणि सदाभाऊ खोतांना प्रत्युत्तर
आमदार रोहित पवार, आमदार नितेश राणे, माजी मंत्री सदाभाऊ खोत
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 3:04 PM

पुणे : राज्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबंधित भागाशी संबंध नसलेल्या नेत्यांनी त्या भागात पाहणी दौरा करु नये. जेणेकरुन यंत्रणा अडकून पडणार नाही, असं आवाहन केलं होतं. मात्र, त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. रोहित पवारांच्या या दौऱ्यावरुन माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार नितेश राणे यांनी रोहित पवारांना टोले लगावले आहेत. राणे आणि खोतांच्या या टोलेबाजीला आता रोहित पवारांनीही उत्तर दिलंय. (MLA Rohit Pawar responds to criticism made by Sadabhau Khot, MLA Nitesh Rane)

सोशल मीडियावर ट्वीट करुन मोकळं व्हायचं. मात्र, प्रत्यक्ष कुठेही जायचं नाही. त्यामुळे या लोकांना महत्व देण्याचं कारण नाही. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात झालेल्या भेटीवरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संकटकाळात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसही त्या भागात फिरत आहेत. माझीही या भागात देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती, असं रोहित पवार म्हणाले. पंचनामे संपल्यावर येत्या 10 ते 12 दिवसांत पूरग्रस्तांना सरकारकडून मदत मिळणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.

सदाभाऊ खोतांची खोचक टीका

पूरग्रस्त भागांचे दौरे टाळण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं खरं पण त्यानंतरही त्यांचे नातू रोहित पवार यांनी चिपळूणचा दौरा केला. कोकणात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. नेमका हाच धागा पकडत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी बोचरा सवाल उपस्थित केला. राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत, असं आजोबांनी सांगितलं… आजोबांच्या सल्ल्याला नातूच मानत नाही… कर्जत-जामखेडचे आमदार चीपळूणच्या दौऱ्यावर…. आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता?, असा बोचरा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला.

आमदार नितेश राणेंची टीका

सातत्याने पवार कुटुंबात विसंगती दिसते. अवेळी बोलणं, जास्त बोलणं हे कधीच पवार कुटुंबीय करत नाही. पार्थ पवार ,सुप्रिया सुळे अस बोलताना कधी दिसले नाहीत. रोहीत पवारांनी आपल्या आजोबांकडून योग्य गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यांचं ऐकलं पाहिजे. नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावे असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो. म्हणून रोहीतजींनी थोडं शिकून मगच पावलं टाकावीत असा माझा मैत्रीचा सल्ला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

संबंधित बातम्या :

मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे

VIDEO | कोल्हापुरात उद्धव-फडणवीस पहाणी करता करता एकमेकांना समोरा समोर भेटले

MLA Rohit Pawar responds to criticism made by Sadabhau Khot, MLA Nitesh Rane

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.