AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 1 August 2023 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी बोलण्यात गोडवा ठेवावा

Horoscope Today 1 August 2023 आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांचे आई-वडिलांच्या आशीर्वादाने रखडलेले काम पूर्ण होईल. मुलाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.

Horoscope Today 1 August 2023 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी बोलण्यात गोडवा ठेवावा
राशी भविष्यImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 01, 2023 | 12:01 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 1 August 2023) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा  ठरणार आहे. तुम्हाला पुण्य कार्याचा पूर्ण लाभ मिळेल. व्यवसायात वाढ झाल्यामुळे आज तुम्ही आनंदी असाल. नोकरीत कामात आत्मविश्वासाने पुढे जाल. शारीरिक समस्या देखील आज दूर होईल. घराच्या नूतनीकरणाचा विचार कराल. तुमचा आनंद पाहून तुमचे काही विरोधक तुमचा हेवा करतील, पण तुम्हाला त्यांची काळजी करण्याची गरज नाही. आध्यात्मिक कार्यात तुमची रूची वाढेल.

वृषभ

व्यवहारात सावधगिरी बाळगण्याचा आजचा दिवस असेल. तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही आज खूप काही मिळवू शकता, पण त्यासाठी तुम्ही संयम बाळगा. वैयक्तिक बाबींमध्ये बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नका. जर कुटुंबातील सदस्यांमध्ये काही मतभेद होत असतील तर आज ते चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय करणारे लोकं मंदीमुळे थोडे चिंतेत राहतील, यामुळे त्यांचा स्वभाव देखील चिडचिड होईल. ज्यांना नोकरी सोबत  अर्धवेळ काम करायचे आहे, त्यांना त्यासाठी वेळ मिळेल.

मिथुन

आज तुम्हाला तुमच्या निर्णय क्षमतेचा फायदा मिळेल.  मित्र आणि सहकाऱ्यांवर विश्वास ठेवा. काही नवीन करारांमुळे तुम्हाला फायदा होईल. आज तुम्हाला मुलांकडून काही निराशाजनक माहिती ऐकायला मिळेल. भावा-बहिणीच्या लग्नात येणार्‍या अडचणीसाठी तुम्हाला अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. तरच ती दूर होईल. महत्त्वाच्या गोष्टीत गुप्तता पाळा.

कर्क

आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. तुम्हाला कार्यक्षेत्रात काही मोठी उपलब्धी मिळू शकते आणि बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना बचत योजनेचा चांगला लाभ मिळेल. परिश्रम करून अधिकाऱ्यांना खूश कराल. सहकाऱ्यांची साथ मिळेल. सेवा क्षेत्रात पूर्ण रस असेल.  कोणत्याही जोखमीच्या कामात हात घालणे टाळा. विनाकारण एखाद्या गोष्टीची चिंता लागून राहिल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या आज पूर्ण होतील.

सिंह

आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच एखाद्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जास्त काम केल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवेल. तुमच्या उर्वरित कामाबद्दल चिंतेत असाल. तब्बेतीकडे लक्ष द्या. कुटुंबातील एखाद्या सदस्याला घरापासून दूर नोकरी मिळाल्याने त्यांना जावे लागू शकते. जवळच्या मित्राकडून पैशांची मागणी होऊ शकते.

कन्या

आजचा दिवस तुमच्यासाठी शहाणपणाने आणि विवेकाने निर्णय घेण्याचा असेल. कोणाशीही वाद घालू नका. घरी पाहुणे आल्याने कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त राहतील. वडिलधाऱ्यांशी बोलताना तुमचा मुद्दा न चिडता पटवून सांगा. नोकरी व्यावसायाच्या निमीत्त्याने लांबचा प्रवास होऊ शकतो. प्रवासाला गेलात तर आई-वडिलांचे आशीर्वाद अवश्य घ्या. काही नवीन लोक भेटतील. तुमची आवश्यक कामे पूर्ण करण्यात तुम्ही दिवसाचा बराच वेळ घालवाल.

तूळ

आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. बंधुभावात तुमची आवड वाढेल आणि काही नवीन संपर्कातून तुम्हाला फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सावध राहावे, अन्यथा कोणी विरोध करण्याचा प्रयत्न करू शकतो. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे कोणतेही रखडलेले काम पूर्ण होईल. मुलाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा अडचण येऊ शकते. कुटुंबातील लोक तुमच्या बोलण्याला पूर्ण आदर देतील.

वृश्चिक

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. ज्येष्ठांचे सहकार्य आणि आदर राखावा लागेल. काही जुन्या परंपरा सोडून तुम्ही मुलांच्या विचारावर पुढे जाल.  सुखसोयींच्या  वस्तूंच्या खरेदीवरही पैसा खर्च कराल. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबतीत संयम बाळगा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाने लोकांची मने जिंकू शकाल. नवीन वाहन खरेदी करण्याचा योग आहे. वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही चांगले काम कराल.

धनु

आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. दूरच्या नातेवाईकाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीची गाठ पडू शकते.  जवळच्या व्यक्तींचे खूप सहकार्य मिळेल. विचारलेले नसताना सल्ला देणे टाळावे. बोलण्यात आणि वागण्यात गोडवा ठेवा. सर्जनशील कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबातील कोणीतरी तुमच्यासाठी सरप्राईज पार्टीची योजना करू शकते.

मकर

आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चिक असणार आहे. आज तुम्ही काही सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्याल. कौटुंबिक नात्यात नम्रता ठेवा, अन्यथा रक्ताच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी वादाची परिस्थिती उद्भवली असेल तर संपूर्ण गोष्ट जाणून घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. अन्यथा अधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. मुलं आज एखादी वस्तू घेऊन देण्याचा हट्ट करतील.

कुंभ

आजचा दिवस तुमच्या प्रभाव आणि वैभवात वाढ घडवून आणणार आहे. तुम्ही कुटुंबातील मोठ्या सदस्यांचा विश्वास जिंकू शकाल. तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. कामाच्या शोधात असलेल्या लोकांसाठीही दिवस चांगला जाईल. तुमच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. लाभाची कोणतीही संधी मिळाली तर ती हातून जाऊ देऊ नका. मित्रासोबत तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा द्याल. व्यावसायिक बाबींनाही आज गती मिळेल. राजकारणात हात आजमावणाऱ्यांना आज सावध राहावे लागेल.

मीन

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल आणि तुम्हाला वडिलधाऱ्यांचे खूप सहकार्य मिळेल. नोकरीत काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते, त्यामुळे त्यांचा पगारही वाढेल. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल. कुटुंबात पार्टी आयोजित केली जाऊ शकते. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बदल केले तर तुमची काही कामे दीर्घकाळ लटकतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.