Pitrudosh Upay : घराच्या या दिशेला असतो पितरांचा वास, या चुका अवश्य टाळा

| Updated on: Jun 07, 2023 | 4:35 PM

पितरांचे श्राद्ध वगैरे केले नाही किंवा त्यांचे स्मरण केले नाही तर नकारात्मक प्रभावाला समोर जावे लागते अशी धार्मिक मान्यता आहे. तसेस कळत नकळत घडलेल्या काही चुकांमुळे पितृदोष (Pitrudosh Upay) निर्माण होतो.

Pitrudosh Upay : घराच्या या दिशेला असतो पितरांचा वास, या चुका अवश्य टाळा
पितृदोष
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : घराच्या दक्षिण दिशेला पितरांचा वास असतो असे मानले जाते. घरातल्या या दिशेसंबंधीत काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या गोष्टींची काळजी न घेतल्यास घरामध्ये पितृदोष निर्माण होऊ लागतात. पितरांचे श्राद्ध वगैरे केले नाही किंवा त्यांचे स्मरण केले नाही तर नकारात्मक प्रभावाला समोर जावे लागते अशी धार्मिक मान्यता आहे. तसेस कळत नकळत घडलेल्या काही चुकांमुळे पितृदोष (Pitrudosh Upay) निर्माण होतो. यामुळे आरोग्याच्या तक्रारी व आर्थीक समस्यांचा सामना करावा लागतो.

पुर्वजांचे फोटो लावताना या गोष्टींची काळजी घ्या

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. अशा स्थितीत पूर्वजांचे फोटो नेहमी उत्तर दिशेला लावावे. तसेच पितरांचे तोंड दक्षिण दिशेला असावे. त्याचबरोबर बेडरूममध्ये किंवा ड्रॉईंग रूममध्ये पूर्वजांचे फोटो लावू नयेत. असे मानले जाते की या ठिकाणी पूर्वजांचे फोटो ठेवल्याने घरातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. एकापेक्षा जास्त पूर्वजांचे फोटो घरात ठेवू नयेत हेही लक्षात ठेवा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तसेच देवघरात किंवा स्वयंपाकघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत.

हे सुद्धा वाचा

पितृदोष दूर करण्याचे उपाय

  • संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि नाग स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्र सूक्त, पितृ स्तोत्र आणि नवग्रह स्तोत्र पठण करा. यामुळे पितृदोषात शांती मिळते.
  • इष्ट देवतेची आणि कुल देवतेची रोज पूजा करा. असे केल्याने पितृदोषही नाहीसा होतो.
  • भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा, श्रीमद्भागवत गीतेचा पाठ करा, यामुळे पितरांची शांती होते आणि दोष कमी होतात.
  • पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महामृत्युंजयाच्या मंत्राने भगवान शिवाला अभिषेक करावा. घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर आपल्या दिवंगत नातेवाईकांचे फोटो लावा आणि त्यांना रोज नमस्कार करा. असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.
  • रोज नियमितपणे हनुमान चालिसाचा पाठ करा. हनुमान चालिसाचा पाठ केल्याने हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळतो.
  • गरजू किंवा ब्राह्मणांना त्यांच्या दिवंगत नातेवाईकांच्या मृत्यूच्या तिथीला अन्नदान करा. दिवंगत नातेवाईकांच्या आवडीनुसार जेवण बनवावे.
  • दररोज पितृकवच पठण करा, असे केल्याने पितृदोष शांती मिळते.
  • आपल्या कुवतीनुसार गरिबांना वस्त्र, अन्न इत्यादी दान करा. असे केल्याने हा दोषही दूर होतो.
  • दुपारी पिंपळाच्या झाडावर पाणी, फुले, अक्षत, दूध, गंगाजल, काळे तीळ अर्पण करा आणि स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद मागा.
  • पूर्वजांच्या नावाने फलदायी, सावलीची झाडे लावा. यामुळे दोषही कमी होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)