Vastu Tips: नवीन वर्ष सुरू होण्याआधी घरात आणा या 6 वस्तू, चुंबकासारखा खेचला जाईल पैस!

| Updated on: Dec 04, 2022 | 5:37 PM

वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू घरात असल्याने लक्ष्मीची कृपा सदैव राहते. याशिवाय घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते.

Vastu Tips: नवीन वर्ष सुरू होण्याआधी घरात आणा या 6 वस्तू, चुंबकासारखा खेचला जाईल पैस!
वास्तुशास्त्र
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  2022 हे वर्ष संपणार आहे. सरत्या वर्षाबरोबरच आपल्या जीवनातील समस्या आणि दुःख या वर्षातच संपावेत, असे प्रत्येकाला वाटते. नवीन वर्ष  2023 (New Year 2023) हे प्रत्येकासाठीच आशादायी असून या वर्षी सुखसमृद्धी लाभावी आणि सर्व समस्या दूर व्हाव्या अशी प्रत्त्येकाची इच्छा आहे. वास्तुशास्त्रात (Vastushastra) अशा अनेक शुभ गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या घरी आणल्याने दारिद्र्य दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. या वस्तू घरात ठेवल्याने पैशाची कमतरता भासत नाही.

  1. छोटा नारळ- अनेकांच्या घरात ठेवलेला छोटा नारळ तुम्ही पाहिलाच असेल. त्याला लहान नारळ किंवा श्रीफळ असेही म्हणतात. हा नारळ निःसंशयपणे आकाराने लहान असला तरी घरातील मोठ्या अडचणी दूर करण्याची ताकद यात आहे.
  2. धातूचे कासव- नवीन वर्ष संपण्यापूर्वी लहान धातूचे कासव घरी आणावे. चांदी, पितळ किंवा ब्राँझपासून बनवलेले कासव घरी ठेवू शकता. कासव हा भगवान विष्णूचा कूर्म अवतार मानला जातो. हे घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवणे खूप शुभ असते.
  3. कौड्या- 2022 वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही घरात कौड्या आणू शकता. लाल कपड्यात बांधून घराच्या मुख्य दारात बांधल्याने नकारात्मक ऊर्जा प्रभावित होत नाही.
  4. पाण्याचे भांडे- नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही मातीचे भांडेही घरी आणू शकता. या भांड्यात पाणी उत्तर दिशेला ठेवल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात.
  5. हे सुद्धा वाचा
  6. धातूचा हत्ती- धातूपासून बनवलेल्या हत्तीची मूर्ती घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित  होते आणि वाईट शक्तींचा नाश होतो.  यावेळी नवीन वर्षासाठी, घन चांदीच्या धातूची हत्तीची मूर्ती खरेदी करा. हत्ती घरात ठेवल्याने  घरात शांती आणि समृद्धी राहते.
  7. मोरपंख – भगवान श्रीकृष्णाचे सर्वात प्रिय मोरपंख ज्या घरात असते  तेथे माता लक्ष्मी वास करते. जर तुम्हाला तुमचे नवीन वर्ष आनंदाने भरायचे असेल तर घरात मोराची पिसे जरूर आणा, पण फक्त 1 ते 3 मोराची पिसे असावीत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)