AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोईंगपटू दत्तू भोकनळवर फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : भारताचा पदकविजेता रोईंगपटू दत्तू भोकनळवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचं आश्वासन देऊनही दत्तूने फसवलं असा आरोप एका तरुणीने केला आहे. तिच्या तक्रारीनंतर नाशिकमधील आडगाव पोलिस ठाण्यात फसवणूक तसेच शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार तरुणीच्या दाव्यानुसार, दत्तू आणि तिने एकांतात लग्न केलं होतं. मात्र, नंतर नातेवाईकांसमोर आपण लग्न […]

रोईंगपटू दत्तू भोकनळवर फसवणुकीचा गुन्हा
| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM
Share

नाशिक : भारताचा पदकविजेता रोईंगपटू दत्तू भोकनळवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचं आश्वासन देऊनही दत्तूने फसवलं असा आरोप एका तरुणीने केला आहे. तिच्या तक्रारीनंतर नाशिकमधील आडगाव पोलिस ठाण्यात फसवणूक तसेच शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार तरुणीच्या दाव्यानुसार, दत्तू आणि तिने एकांतात लग्न केलं होतं. मात्र, नंतर नातेवाईकांसमोर आपण लग्न करू असे ठरले असतानाही दत्तूने नकार दिला”, असा तक्रारदार महिलेचा दावा आहे.

दत्तू भोकनळ हा नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या छोट्याशा गावचा आहे. त्याने नौकानयन या क्रीडाप्रकारात भारताचं नाव उज्वल केलं आहे. दत्तूने 2014 मध्ये त्याने राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली. मग 2015 मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरले.

आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी

महाराष्ट्राचा रोलिंगपटू दत्तू भोकनळने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. अंगात 104 इतका ताप असतानाही दत्तूने आशियाई गेम्समध्ये  भारतीय टीमला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. सरकारने या खेळाला अजून प्रोत्साहन दिले पाहिजे ज्यामुळे देशाला मेडल मिळू शकतील, असं मत दत्तू भोकनळने त्यावेळी व्यक्त केले होते.

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.