WIND vs WSL : टीम इंडिया-श्रीलंका आमनेसामने, आशिया कप फायनलमधील पराभवाचा वचपा घेण्याची संधी, कोण जिंकणार?

Womens India vs Womens Sri lanka: श्रीलंकेने टीम इंडियाचा वूमन्स आशिया कप फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. आता टीम इंडियाकडे त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.

WIND vs WSL : टीम इंडिया-श्रीलंका आमनेसामने, आशिया कप फायनलमधील पराभवाचा वचपा घेण्याची संधी, कोण जिंकणार?
womens sri lanka vs womens india cricket team
Image Credit source: Icc X account
| Updated on: Oct 09, 2024 | 12:30 AM

आयसीसी वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 12 व्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका या 2 आशियाई संघांमध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील एकूण तिसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांसाठी हा अतिशय महत्त्वाचा असा सामना असणार आहे. श्रीलंकेचा या स्पर्धेतील पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे, मात्र त्यांच्याकडे अखेरची आणि जरतरची संधी आहे. तर टीम इंडियाने पराभवाने सुरुवात केल्यानंतर दुसरा सामना जिंकला. भारताने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाला सेमी फायनलचा दावा कायम ठेवायचा असेल, तर या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

टीम इंडिया वचपा घेणार?

श्रीलंकेने टीम इंडियाला आशिया कप फायलनमध्ये पराभूत केलं होतं. टीम इंडियाला आता त्या पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे. टीम इंडियाकडे हा सामना जिंकून गेल्या पराभवाची परतफेड करण्यासह उपांत्य फेरीसाठीची दावेदारी आणखी मजबूत करण्याची संधी आहे. हरमनप्रीत कौर हीला मानेच्या दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागू शकतं, अशा परिस्थितीत स्मृती मानधाना हीला भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते. तर चमारी अथापथु हीच्याकडे श्रीलंकेचं कर्णधारपद आहे. दोन्ही संघासाठी हा सामना निर्णायक असा आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना केव्हा?

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना कुठे?

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे.

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7वाजता टॉस होईल.

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

भारतीय महिला संघ: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सजीवन सजना, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग, पूजा वस्त्राकर, राधा यादव, दयालन हेमलता आणि यास्तिका भाटिया.

श्रीलंका महिला संघ : चामरी अथापथु (कॅप्टन), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, इनोका रानावेरा, उदेशिका प्रबोधनी, अमा कांचना, अचीनी कुलसूर्या, सचिन निसांसला आणि शशिनी गिम्हनी.