Sai Sudharsan IPL 2022: 20 वर्षाच्या मुलाने कमाल केली, सगळे फेल पण त्याने फिफ्टी ठोकले

Sai Sudharsan IPL 2022: तामिळनाडूच्या या युवा खेळाडूला गुजरात टायटन्सने फक्त 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये विकत घेतलं होतं.

Sai Sudharsan IPL 2022: 20 वर्षाच्या मुलाने कमाल केली, सगळे फेल पण त्याने फिफ्टी ठोकले
Sai Sudharsan
Image Credit source: IPL
| Updated on: May 03, 2022 | 10:36 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्समध्ये (GT vs PBKS) सामना सुरु आहे. गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन (Sai Sudharsan) या मुलाने आज दमदार खेळ दाखवला. गुजरातच्या टीमने या सामन्यात 143 धावा केल्या. गुजरातचे अन्य फलंदाज आज संघर्ष करत होते. पण दुसऱ्या टोकाकडून साई सुदर्शनने टिकून फलंदाजी केली. तिसऱ्या षटकात फलंदाजीला आलेला साई सुदर्शन शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळपट्टीवर होता. त्याने 50 चेंडूत नाबाद 65 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. 20 वर्षाच्या साई सुदर्शनने आज संयम आणि समज अशा दोन्ही गुणांचा मेळ दाखवला. गुजरातचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत असताना, त्याने दुसरीबाजू लावून धरली. या धीम्या पीचवर गुजरातच्या फलंदाजांचा धावांसाठी संघर्ष सुरु होता. त्यावेळी साई सुदर्शनने स्ट्राइक रोटेट करण्यावर भर दिला.

तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये किती धावा केल्या?

तामिळनाडूच्या या युवा खेळाडूला गुजरात टायटन्सने फक्त 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये विकत घेतलं होतं. साई सुदर्शनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या खेळाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये या युवा खेळाडूने 358 धावा केल्या. तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या स्थानावर होता.

20 वर्षाच्या मुलाचा कमालीचा खेळ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

चार सामन्यात किती धावा केल्या?

याच कामगिरीच्या बळावर त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली. त्याने अनेकदा संघासाठी उपयुक्त खेळी केली. चार सामन्यात साई सुदर्शनने एकूण 135 धावा केल्या आहेत. यात पंजाब किंग्स विरुद्ध अर्धशतकाचा समावेश आहे. आतापर्यंत साई सुदर्शनने आयपीएलमध्ये 35, 11, 20 आणि 65 धावांची इनिंग खेळला आहे.