Jasprit Bumrah च्या बर्थ डे ला बायको झाली रोमँटिक, मेसेजमध्ये म्हणाली….

संजना गणेशनने दोघांचा एक खास फोटो शेअर केलाय....

Jasprit Bumrah च्या बर्थ डे ला बायको झाली रोमँटिक, मेसेजमध्ये म्हणाली....
jasprit bumrah-Sanjna ganeshan
Image Credit source: instagram
| Updated on: Dec 06, 2022 | 3:05 PM

मुंबई: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा आज 6 डिसेंबरला वाढदिवस आहे. त्याने 29 व्या वर्षात पदार्पण केलय. बर्थ डे असल्याने जसप्रीत बुमराहवर शुभेच्छाचा वर्षाव सुरु आहे. बुमराहचे चाहते फक्त भारतातच नाही, तर जगभरात आहेत. त्यामुळे बुमराह शुभेच्छा दिल्या जात आहेत. यावेळी जसप्रीत बुमहारला पत्नी आणि स्पोर्ट्स प्रेजेंटर संजना गणेशनने खास रोमँटिक शुभेच्छा दिल्या आहेत.

संजनाने कॅप्शनमध्ये काय लिहिलय?

संजना गणेशनने जसप्रीत बुमराहसोबतचा रोमँटिक फोटो शेयर केलाय. दोघे खूपच रोमँटिक मूडमध्ये दिसतायत. या फोटोला कॅप्शन देताना संजनाने लिहिलय की, “माझे आजचे आणि उद्याचे येणारे सर्वच क्षण तुझे आहेत. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही, इतकं प्रेम तुझ्यावर करते”

अफेअर कधी सुरु झालेलं?

संजना गणेशन आणि जसप्रीत बुमराह बराच काळ परस्परांपासून लांब होते. संजना आयसीसीची स्पोर्ट्स प्रेजेंटर आहे. ती वेगवेगळ्या दौऱ्यांवर असते. सध्या दोघांचा सुखी संसार सुरु आहे. संजना गणेशन आणि जसप्रीत बुमराहने लग्न होईपर्यंत आपलं अफेयर लपवून ठेवलं होतं. 2019 साली इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. बुमराह टीम इंडियाचा भाग होता. संजना स्पोर्ट्स प्रेजेंटर म्हणून तिथे गेली होती. मागच्यावर्षी मार्च महिन्यात दोघांनी लग्न केलं.

जसप्रीत बुमराह टीमबाहेर का?

जसप्रीत बुमराह सध्या पाठदुखीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये तो याचमुळे खेळू शकला नाही. त्याला तीन-चार महिने विश्रांती घ्यावी लागणार आहे. जसप्रीत बुमराह अचूक यॉर्कर आणि टप्प्प्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाकडे सगळ्यांचेच डोळे लागले आहेत.