Rivaba Jadeja | रवींद्र जडेजा याची पत्नी आमदार रीवाबा जडेजा महापौरांवर भडकल्या

Jamnagar Rivaba Jadeja Angry On Mayor | आमदार रीबावा जडेजा यांचं रौद्र रुप पाहायला मिळालं. रीबावा जडेजा या महापौरांवर चांगल्याच संतापल्या. हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

Rivaba Jadeja | रवींद्र जडेजा याची पत्नी आमदार रीवाबा जडेजा महापौरांवर भडकल्या
| Updated on: Aug 17, 2023 | 5:22 PM

गांधीनगर | जामनगर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि क्रिकेटर रविंद्र जडेजा याची पत्नी रीवाबा जडेजा यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रीवाबा जडेजा या व्हीडिओत चांगल्याच संतापलेल्या दिसून येत आहेत. रिवाबाे जडेजा या महापौर यांच्यावर चांगल्याच बरसल्या. रीवाबा महापौरांवर संतापल्याचं पाहून खासदारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यात यश आलं नाही. रीवाबा जडेजा नक्की भडकल्या, महापौरांवर संतापण्यासारखं असं नक्की काय झालं, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

रिवाबा जडेजा आऊट ऑफ कंट्रोल

नक्की काय झालं?

हा सर्व प्रकार जामनगर लखोटा झील इथला असल्याचं म्हटलं जात आहे. रीवाबा जडेजा व्यतिरिक्त भाजप खासदार पूनमबेन, महापौर बीनाबेन कोठारी, अधिकारी आणि इतर अन्य व्यक्ती उपस्थित होत्या. या दरम्यान महापौर आणि रीवाबा जडेजा यांच्यात काही कारणाने हमरीतुमरी पाहायला मिळाली. आमदार आणि महापौर या दोघांमधील वाद चांगलाच पेटला. भाजप खासदारांनी हे सर्व पाहून रीवाबा यांना शांक करण्याचा प्रयत्न केला. मात्र रीवाबा आणि महापौर यांच्यात वाकयुद्ध सुरुच राहिलं.

“शांत रहा, शहाणी बनू नकोस”

खासदार पूनमबेन यांनी त्यानंतरही रिवाबा जडेजा यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र नाराज रिवाबा यांनी कुणालाच जुमानलं नाही. इतकंच काय तर रिवाबाने पूनमबेन यांनाही सुनावलं. “शांत रहा, शहाणी बनू नकोस. तुम्हीच हे सर्व करत आहात”, असं रिवाबा या व्हीडिओत म्हणत आहेत. रीवाबा जडेजा पक्षाच्या खासदारांचंही ऐकलं नाही. त्यामुळे अखेर नाईलाजाने जिल्हा पोलीस प्रमुख प्रेमसुख डेलू यांनी हस्तक्षेप केला. प्रेमसुख यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आणि अखेर रीबावा जडेजा यांना शांत करण्यात यश आलं.