Video | बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले, स्टंट करीत स्टाइलमध्ये खाल्ला गुटखा, मग…

Video | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरुण बाईकवरती स्टंट करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या स्टंट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यावर कारवाई केली आहे.

Video | बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले, स्टंट करीत स्टाइलमध्ये खाल्ला गुटखा, मग...
Stunt Viral Video
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 11, 2023 | 7:48 AM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर बाईकवरती स्टंट (Stunt Viral Video) केलेले अनेक व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. काही लोकं मुद्दाम असे स्टंट करीत असतात की, त्यामुळे ते व्हायरल (Viral Video) झाले पाहिजेत. सध्या सोशल मीडियावर तरुण आणि तरुणी यांचे बाईकवरती स्टंट केलेले अनेक व्हिडीओ आहेत. ज्यामध्ये अनोखी कृती केलेली आहे, असे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) अधिक व्हायरल झाले आहेत. सध्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्या तरुणाने एक अनोखा स्टंट केल्यामुळे तो व्हायरल झाला आहे. त्या तरुणावरती पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

रस्त्याने गाड्या जोरात पळवतात.

आपल्या देशात अनेक तरुण रस्त्यावर भरधाववेगाने गाडी चालवत असल्याचं पाहायला मिळतं. काही तरुण गाडी अधिक स्पीडने पळवून त्यावर स्टंट करीत असल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट झालं आहे. ज्या तरुणांनी जीवघेणा स्टंट केला आहे, अशावरती पोलिसांनी कारवाई सुध्दा केली आहे. तरी सुध्दा स्टंट केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

स्टंट करीत असताना खाल्ला गुटखा

सध्या एका ज्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बाईक स्पीडने पळवून त्यावर त्या तरुणाने स्टंट केला आहे. त्या व्यक्तीची गाडी एकदम स्पीडमध्ये आहे, त्याचवेळी ती व्यक्ती बाईकवरती उभी राहिली आहे. गाडीचे हॅडल त्या व्यक्तीने सोडून दिले आहे. ती व्यक्ती तिथं गाडीवर गुटखा खाण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर तुमच्या सुध्दा डोळ्यावरील विश्वास उडेल. हा व्हिडीओ उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथील गौतम बुद्ध पार्क मधील असल्याचा माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी केली अटक

हा व्हिडीओ एएनआईने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. हा शेअर करीत असताना त्यांनी सांगितलं आहे की, बाईकवरती स्टंट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. देशात अशा पद्धतीने स्टंट करणाऱ्या व्यक्तींवरती कारवाई करण्यात आली आहे. अशा पद्धतीचे स्टंट करीत असताना अनेकांना मृत्यू देखील झाला आहे.