Small Saving Schemes| रेपो दरात वाढ, तुमची अल्पबचत गुंतवणूक ठरेल का फायदेशीर? व्याजदरात होईल का वाढ? माहिती एका क्लिकवर

| Updated on: Aug 07, 2022 | 10:52 AM

Small Saving Schemes| रेपो दरात वाढीच्या निर्णयाचा तुम्हाला कितपत होऊ शकतो फायदा? अल्पबचत योजनेच्या गुंतवणुकीवर काय होईल परिणाम?

Small Saving Schemes| रेपो दरात वाढ, तुमची अल्पबचत गुंतवणूक ठरेल का फायदेशीर? व्याजदरात होईल का वाढ? माहिती एका क्लिकवर
बचतीवर केव्हा मिळेल वाढीव व्याज
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Small Saving Schemes| भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पतधोरण ठरविताना तिसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. तीन महिन्यांत रेपो दरात (Repo Rate) 1.40 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 रोजी रेपो दर पुन्हा एकदा 0.50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रीय बँकेने घेतला. रेपो दर आता 5.40 टक्क्यांवर पोहचल्यानं बँकांनाही रिझर्व्ह बँकेकडून कर्ज (Loan) घेताना ते वाढीव दराने मिळणार आहे. या निर्णयाचे पडसाद आता बाजारात उमटू लागले आहे. अनेक बँकांनी कर्जावरील व्याज दरात वाढ केली आहे. तर अनेक बँका बचत खाते, एफडी (FD) आणि आरडी (RD)वरील व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. अशावेळी अल्पबचत योजनांचे (Small Saving Scheme) काय होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? आरबीआयच्या निर्णयानंतर सप्टेंबरअखेर या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. रेपो रेट वाढविण्याच्या निर्णयानंतर ठेवींचे दर वाढत आहेत, अशा परिस्थितीत अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करता येईल, अशी अपेक्षा आहे.

या अल्पबचत योजना लोकप्रिय

अल्प बचत योजनांमध्ये सर्वसामान्य नागरीक सर्वाधिक गुंतवणूक करतात, त्या योजनांवरील व्याजदर मात्र अद्यापही वाढवण्यात आलेले नाहीत. दोन महिन्यांपूर्वी या योजनांवरील व्याजदर वाढीचा मोठी चर्चा झाली. पण केंद्र सरकारने याविषयी कुठलाही निर्णय घेतला नाही. एनएससी(NSC), पीपीएफ(PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Scheme) यासारख्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

बचत योजनांवरील व्याजदर वाढीची शक्यता

आरबीआयने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक बँकांनी ठेवींवरील व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. 30 जून 2022 रोजी अर्थ मंत्रालयाने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केला नव्हता. परंतु चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी अर्थ मंत्रालय जेव्हा 30 सप्टेंबर 2022 रोजी या बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेईल, तेव्हा या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

बचत योजनांवरील व्याजदर

सध्या सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील(PF) व्याजदर वार्षिक 7.1 टक्के, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर (NSC) 6.8 टक्के, सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 7.4 टक्के, किसान विकास पत्रावर 6.9 टक्के, एक वर्षाच्या मुदत ठेव योजनेवर 5.5 टक्के आणि एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवींना 5.5-6.7 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर 5 वर्षांच्या ठेव योजनेवर 5.8 टक्के व्याज दिले जात आहे.  या योजनांवर येत्या महिन्याभरात व्याजदर वाढीची शक्यता आहे.