Ashadhi Ekadashi 2021 | आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते सपत्निक महापूजा

Ashadhi Ekadashi 2021 | आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते सपत्निक महापूजा

| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 7:53 AM

यंदा दरवर्षीसारखा जरी जल्लोष होणार नसला तरी प्रत्येक पालखीसोबत यावर्षी 30 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. 

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. पण गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी पोलीस प्रशासनाने वारकऱ्यांसाठी थोडी मुभा दिली आहे. पंढरपुरात मानाच्या दहा पालख्या दाखल झाल्या आहेत. यंदा दरवर्षीसारखा जरी जल्लोष होणार नसला तरी प्रत्येक पालखीसोबत यावर्षी 30 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.

Published on: Jul 20, 2021 07:50 AM