India Pakistan Conflict : अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम

India Pakistan Conflict : अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम

| Updated on: May 11, 2025 | 12:20 PM

Stress Full Silence On Attari Border : भारत पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन न करण्याच्या निर्णयानंतर अटारी सीमेवर आज तणावपूर्ण शांतता बघायला मिळाली आहे.

भारत-पाकिस्तान युद्धविरामानंतर अटारी सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. मात्र अमृतसरमध्ये अजूनही रेड अलर्ट जारी आहे. अटारी सीमेवर सध्या कोणालाही प्रवेश नाही. सुरक्षेच्या दृष्टीने बॉर्डरवर मोठ्याप्रमाणात जवान तैनात करण्यात आलेले आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. त्यानंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांनी भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काल याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देशात शस्त्रसंधीचं उल्लंघन न करण्याच्या निर्णयावर एकमत झालं आहे. मात्र तरीही काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करण्यात आलेला होता. त्यामुळे आज अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता बघायला मिळत आहे.

Published on: May 11, 2025 12:20 PM