बीड मतदारसंघात नेमकं घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर

परळीमध्ये बूथ कॅप्चरिंग झाल्याचे आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आले होते. इतकंच नाहीतर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने थेट व्हिडीओच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. यामध्ये मतदारांच्या बोटाला केवळ शाई लावली जातेय तर बटण दाबणारा व्यक्ती दुसराच असल्याचे दिसतंय.

बीड मतदारसंघात नेमकं घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर
| Updated on: May 24, 2024 | 10:14 PM

गेल्या १३ मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. दरम्यान, या दिवशी परळीमध्ये बूथ कॅप्चरिंग झाल्याचे आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आले होते. इतकंच नाहीतर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने थेट व्हिडीओच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. यामध्ये मतदारांच्या बोटाला केवळ शाई लावली जातेय तर बटण दाबणारा व्यक्ती दुसराच असल्याचे दिसतंय. हा व्हिडीओ तुम्हीही जरा नीट पहा… ईव्हीएम मशीन जवळ निळा शर्ट घातलेला व्यक्ती ईव्हीएम मशीनचं बटण दाबतो. परळीमध्ये बूथ कशा प्रकारे कॅप्चरिंग करण्यात आलं हे या व्हिडीओमधून स्पष्ट दिसतंय. बाजूला मतदारांची यादी घेऊन बसलेले कर्मचारी आहे . त्यांच्याबाजूलाच हा निळ्या शर्ट घातलेला व्यक्ती उभा आहे. बोटाला शाई लावून आलेला मतदार ईव्हीएम मशीन जवळ आपले मत देण्यासाठी जातो तेव्हा त्यांना परत पाठवल्याचे पाहायला मिळतंय.

Follow us
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.
ट्रिपल इंजिन सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार, कुणाची नावं चर्चेत?
ट्रिपल इंजिन सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार, कुणाची नावं चर्चेत?.
भीषण रेल्वे अपघात, एक्सप्रेसला मालगाडीची धडक, अनेक बोगी उलटल्या अन्...
भीषण रेल्वे अपघात, एक्सप्रेसला मालगाडीची धडक, अनेक बोगी उलटल्या अन्....
कोकणात महायुतीतच बॅनर वॉर..बाप, कुत्ता, झुंड अन हिसाब; काय झळकले बॅनर?
कोकणात महायुतीतच बॅनर वॉर..बाप, कुत्ता, झुंड अन हिसाब; काय झळकले बॅनर?.
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.