अटल सेतूवर पडल्या लांबच लांब भेगा, नाना पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश

अटल सेतूवर पडल्या लांबच लांब भेगा, नाना पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश

| Updated on: Jun 21, 2024 | 4:44 PM

मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या अटल सेतूवर भेगा पडल्याचे समोर आले आहे. उद्घाटन झाल्याच्या काही महिन्यातच या उड्डाण पुलाला नवी मुंबईकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अटल सेतूला भेगा पडल्या आहेत. नाना पटोले यांनी याचा पर्दाफाश केला आहे. बघा व्हिडीओ...

गेल्या काही दिवसांपूर्वी अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या अटल सेतूवर भेगा पडल्याचे समोर आले आहे. उद्घाटन झाल्याच्या काही महिन्यातच या उड्डाण पुलाला नवी मुंबईकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अटल सेतूला भेगा पडल्या आहेत. या भेगा कमीत कमी अर्धा किलोमीटरपर्यंत पडलेल्या असल्याचे सांगितले जात आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याचा पर्दाफाश केला आहे. अटल सेतूवर अर्धा किलोमीटरपर्यंत या भेगा पडल्या असून एक नव्हे तर तीन ते चार भेगा पडल्या आहेत. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्याने हा रस्ता खचण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर हा मुद्दा अधिवेशनात देखील नाना पटोले मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अटल सेतूवरील काँक्रिटला भेगा पडल्यानंतर नाना पटोले यांनी त्याची पहाणी केली आहे.

Published on: Jun 21, 2024 04:44 PM