लोक भाजपला जरूर निवडून देतील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना विश्वास

लोक भाजपला जरूर निवडून देतील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना विश्वास

| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 5:45 PM

गोव्याची जनता आम्हाला जरूर निवडून देईल, असं विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

गोवा विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. अश्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याची विधानसभा निवडणूक आणि भाजपचा जाहिरनामा याविषयी भाष्य केलं. गोव्यातली वाहतूक व्यवस्था सुधारणं, तरुणांना रोजगाराकरिता भत्ता देणं या आमच्या जाहिरनाम्यातील महत्वाच्या बाबी आहेत. हा अर्थ संकल्प गोव्याला विकासाच्या मार्गावर नेणारा आहे. त्यामुळे गोव्याची जनता आम्हाला जरूर निवडून देईल, असं विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.