खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक घेतलं अमित शाह याचं नाव; म्हणाल्या, ”माझ्यावर”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार आहे. तर आपली सिक्युरिटी वाढवण्याची मागणी करणार असल्याचं सांगितल्याने आता आणि काय झालं असा सवाल राज्यातील अनेकांना पडला आहे.
मुंबई : सध्या राज्यात अनेक राजकिय वादंग होताना दिसत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार आहे. तर आपली सिक्युरिटी वाढवण्याची मागणी करणार असल्याचं सांगितल्याने आता आणि काय झालं असा सवाल राज्यातील अनेकांना पडला आहे. यावेळी कारण सांगताना, त्यांनी, मी काय खाते, काय पिते याच्यावर लक्ष ठेवलं जात आहे. इंदापूर आणि पुरंदरमध्ये अनेक पुरुष एकत्र येत एका महिलेवर लक्ष ठेवत आहेत. हे योग्य नाही. माझ्या माझ्या सिक्युरिटीचा प्रश्न. मी एक महिला आहे आणि माझ्यावर जर पुरुष वाईट नजरेने बघणार असतील तर मी अमित शहा यांच्याकडे दाद मागणार असेही त्या म्हणाल्या.
Published on: May 23, 2023 08:24 AM
