Dhananjay Munde : बीड विद्यार्थींनी विनयभंग प्रकरण; मुंडेंचा संदीप क्षीरसागरांवर आरोप
Dhanajay Munde On Beed Molestation Case : बीड येथील लैंगिक छळ प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
बीड शहरातील विद्यार्थिनीच्या विनयभंगाप्रकरणी मंत्री पंकजा मुंडे हे आता मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. तर महिला आयपीएस अधिकाऱ्याची एसआयटी नियुक्त करण्याची मागणी करणार असल्याचं माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील म्हंटलं आहे. तसंच आरोपींसह एकूणच कोचिंग क्लासेसची चौकशी करणं गरजेचं असल्याचं सुद्धा मुंडे यांनी म्हंटलं आहे.
यावेळी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत धनंजय मुंडे म्हणाले की, लहान मुलीवर सतत एक वर्ष लैंगिक अत्याचार झाला आहे. ज्या कोचिंगमध्ये ही मुलगी जात होती त्याच कोचिंगच्या मालकाने आणि पार्टनरने त्यानीच हे कूकृत्य केलं. या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्यांचा राजकीय वारदहस्त आहे. जे लोक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी मिळून केलेलं हे कारस्थान आहे. मी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे, असंही त्यांनी म्हंटलं आहे.
