India Pakistan Ceasefire : पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; पाकचं लष्करच शाहबाज शरीफांना जुमानत नाही

India Pakistan Ceasefire : पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; पाकचं लष्करच शाहबाज शरीफांना जुमानत नाही

| Updated on: May 11, 2025 | 11:19 AM

भारतासोबत युद्धविराम केल्यावरून पाकिस्तान सरकार आणि लष्कर प्रमुख यांच्यात मतभेद असून मुल्ला मुनिरने शाहबाज शरीफ यांचं ऐकण्यास नकार दिला आहे.

पाकिस्तान सरकारच्या विरोधात त्यांचंच लष्कर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे भारतासोबत युद्धविराम केल्यावरून पाकिस्तान सरकार आणि लष्कर प्रमुख यांच्यात मतभेद असल्याचं समजलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर काल संध्याकाळी भारत-पाकिस्तानात युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र असं असतानाही काल रात्री पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सीमेलगतच्या गावात पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करत शस्त्रबंदीचं उल्लंघन करण्यात आलं. त्यानंतर आता पाकिस्तान सरकार आणि लष्करात एकमत नसल्याचं बघायला मिळालं असून पाक सरकार आणि लष्कर परमिकह मुनिर यांच्यात युद्धबंदीवरून मतभेद असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या मतभेदामुळेच काल पुन्हा पाकिस्तान लष्कराकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे.

Published on: May 11, 2025 11:19 AM