India vs Pakistan War : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
PM Narendra Modi Meeting With Indian Army : पाकिस्तानकडून भारतावर हल्ले केले जात आहेत. देशातल्या सध्याच्या स्थितीचा आढावा जाणून घेण्यासाठी आज पंतप्रधान मोदींनी तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांची बैठक घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांसोबत बैठक पार पडली आहे. यावेळी तिन्ही दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधानांना सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारतावर हल्ले केले जात आहेत. हे सर्व हल्ले भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या जवानांकडून परतवून लावले जात आहेट्. देशाच्या सीमावर्ती भागात सध्या तणाव बघायला मिळत आहे. याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बैठक घेतली होती. देशातल्या सगळ्या हालचालींवर मोदी स्वत: लक्ष ठेऊन आहेत. देशात सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीला अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे.
Published on: May 09, 2025 07:35 PM
