क्षेत्र महाबळेश्वर येथे राजमाता जिजाऊ साहेब यांच्या संस्कारांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक 361 वा राजमाता जिजाऊ यांचा ‘सुवर्णतुला’ प्रसंग उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी छत्रपती राजघराण्यातील श्रीमंत छत्रपती वृषाली राजे भोसले उपस्थित होत्या.