Special Report | सुप्रीम कोर्टाच्या फैसल्यावर शिंदे सरकारचं भवितव्य-tv9

| Updated on: Aug 03, 2022 | 9:06 PM

शिवसेनेतून बाहेर गेलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये किंवा इतर पक्षात विलीन होणं अथवा नवा पक्ष स्थापन करणं हाच पर्याय आहे. यानंतर शिवसेनेचे दुसरे वकील अभिषेक मनु सिंघवींनीही जोरदार युक्तिवाद केला.

Follow us on

सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता अंतिम टप्प्यात आल्याचं दिसतंय..
सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला. आणि शेवटी सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांनी, शिंदे गटाचे वकील हरिश साळवेंना आपलं म्हणणं लिखित स्वरुपात मांडण्याचे निर्देश दिले.  शिवसेनेकडून अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवादास सुरुवात केली. विधिमंडळात 2 तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळं आम्हीच खरी शिवसेना आहोत, असं शिंदे गटाला म्हणता येणार नाही. विधिमंडळात बहुमत म्हणजे अवघा पक्ष त्यांचा असं होऊ शकत नाही. मग अशा बहुमताच्या जोरावर सरकारं पाडली जातील. त्यामुळं दहाव्या परिशिष्टाला अर्थ राहणार नाही. शिवसेनेतून बाहेर गेलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये किंवा इतर पक्षात विलीन होणं अथवा नवा पक्ष स्थापन करणं हाच पर्याय आहे. यानंतर शिवसेनेचे दुसरे वकील अभिषेक मनु सिंघवींनीही जोरदार युक्तिवाद केला.