Saif Ali Khan Attack Update : सैफवर हल्ला करणारा व्यक्ती ‘हा’च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात
मुंबई पोलिसांकडून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित व्यक्ती नेमका कोण आहे? CCTV फुटेजमध्ये दिससेला व्यक्ती तो हाच आरोपी आहे का? या बद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांकडून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित व्यक्ती नेमका कोण आहे? CCTV फुटेजमध्ये दिससेला व्यक्ती तो हाच आरोपी आहे का? या बद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, मुंबईतील बांद्रा येथील एका इमारतीत बाराव्या मजल्यावर सैफ अली खानच्या घरात मध्यरात्री दोन वाजता एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली. या व्यक्तीमध्ये आणि सैफच्या मोलकरणीमध्ये वाद झाला. त्याचा आवाज ऐकताच सैफ उठला. यावेळी सैफ आणि घरात शिरलेल्या व्यक्तीमध्ये झटापट झाली. यादरम्यान आरोपीने सैफवर चाकूने सहा वार केले आणि त्याला गंभीर दुखापत झाली. मात्र हा व्यक्ती सैफच्या घरात नेमका चोरी करण्यास गेला होता? की त्याला सैफची हत्या करायची होती? त्या उद्देश नेमका काय होता? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे काल समोर आलेल्या फोटोतील आरोपी हाच आहे का? त्याच्याकडून कोणती माहिती समोर येतेय? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
